Two PAN Cards Case: मध्य प्रदेशातील आमदार न्यायालयाने समाजवादी पक्षाचे माजी नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना दोन पॅन कार्ड बाळगल्याच्या आरोपात दोषी ठरवत 7 वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. आझम खान यांची 23 सप्टेंबर 2025 रोजी सुटका झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसांत त्यांना पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ते 17 नोव्हेंबर रोजी पुन्हा तुरुंगात दाखल होतील.
काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, 2019 मध्ये भाजप नेते आकाश सक्सेना यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मते, आझम खान यांनी दोन वेगळे पॅन कार्ड वापरले असून दोन्ही कार्डांवर वयाची माहिती वेगळी दर्शवण्यात आली होती. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने दोघांवर आरोप सिद्ध झाले असल्याचे नमूद केले.
हेही वाचा – Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई; मास्टरमाईंड आमिर राशिद अली 10 दिवस NIA कस्टडीमध्ये
तक्रारदाराचा प्रतिसाद
न्यायालयाच्या निर्णयानंतर आकाश सक्सेना म्हणाले, 'सत्याचा विजय झाला. आम्ही नेहमीच न्यायालयाचा आदर केला असून आज न्याय मिळाल्याचा आनंद आहे.' ऑक्टोबर 2023 मध्ये अनेक गुन्ह्यांमधील चौकशीदरम्यान आझम खान तुरुंगात गेले होते. जवळपास सर्वच प्रकरणांत जामीन मिळाल्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु, नवीन निकालामुळे त्यांना पुन्हा कारावास भोगावा लागणार आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या कारकिर्दीत आझम खान हे सर्वात प्रभावी मुस्लिम नेत्यांपैकी एक होते. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सत्ता बदलल्यानंतर त्यांच्यावरील खटल्यांची संख्या वाढली आणि त्यांचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.