Gold Mine Collapse: अचानक हाहाकार माजला! सोन्याची खाण कोसळून 100 कामगारांचा जागीच मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली?

मध्य आफ्रीकेतील पश्चिमी भागात एका सोन्याच्या खाण कोसळून त्यात 100 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Gold Mine Collapse: अचानक हाहाकार माजला! सोन्याची खाण कोसळून 100 कामगारांचा जागीच मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली?

मध्य आफ्रीकेतील पश्चिमी भागातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मध्य आफ्रीकेतील पश्चिमी भागात एका सोन्याच्या खाण कोसळून त्यात 100 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी कॅमेरूनच्या सीमेला लागून असलेल्या मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकातील एका बेकायदेशीर सोन्याच्या खाणीवर भूस्खलन झाल्याने किमान 100 लोकांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- Munich Airport Tail Strike : उड्डाणादरम्यान विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळला; 271 प्रवासी अन् 16 कर्मचारी…

मध्य आफ्रिकेतील बाबुआ शहरापासून सुमारे 50 किलोमीटर (31 मैल) अंतरावर असलेल्या झांबोये खाण परिसरात ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच मृतांचा शोध घेत आहेत. यावेळी 100 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांना बाबुआ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र बुधवारी शोधकार्य सुरू असल्याने अंतिम आकडा अद्याप निश्चित झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चिखलाने माखलेले, बहुतांशी तरुण पुरुष आणि महिला खाण कामगार खाणीतून मृतदेह बाहेर काढताना दिसत होते. इतर अनेक खाण कामगार आणि मजूर त्या विस्तीर्ण परिसरात विखुरलेले दिसत होते, त्यापैकी काही जण मदतीसाठी आक्रोश करत होते. याचपार्श्वभूमिवर सरकारी प्रवक्ते एव्हॅरिस्ट नगामाना यांनी पीडितांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number