एमआयएममुळे मविआत हादरे

एमआयएममुळे मविआत हादरे

ओवेसींच्या एमआयएमने महाविकास आघाडीसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा मविआसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युतीची तयारी दाखवल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर मविआच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमआयएमुळे राष्ट्रवादीत मतभेद

एमआयएमला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वप्रथम सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीतूनच विरोध होत असल्याचे समोर आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला छेद देत एमआयएम हा राष्ट्रवादीचा समविचारी पक्ष आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तर छगन भुजबळ यांनी वेगळीच भूमिका मांडली  आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांचे सांत्वन करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जलील यांची भेट घेतली. त्यावरून एमआयएम आणि मविआच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. जलील यांनी एमआयएमला भाजपाची बी टीम म्हणून हिणवणाऱ्या मविआ नेत्यांना सोबत घेण्याचे वक्तव्य केले आणि त्यावर टोपे यांनाही भूमिका घ्यावी लागली.

एमआयएममुळे शिवसेनेत अस्वस्थता

काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version