महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाद्वारे प्रत्येकाला आपल्या अभिनयाने पोट दुखेपर्यंत हसवणारे हास्यमहारथी समीर चौघुले यांची नवीन ओळख म्हणजे 'डहाणूकरचे स्टार'. लोकप्रिय अभिनेते प्रथमेश परबने समीर चौघुले यांच्या विषयीची ही नवीन ओळख सोशल मीडीयावर शेअर केली. त्याने 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि "परफॉर्मन्स बघताना हसण्यापेक्षा अभिमानाने रडायला जास्त येत होतं"…. असं म्हणत खास इन्स्टा पोस्ट शेअर केली.
अभिनेता प्रथमेश म्हणाला,
"इतके हसलोय अरे… पण खरं सांगू, हा अडीच तासांचा परफॉर्मन्स बघताना हसण्यापेक्षा अभिमानाने रडायला जास्त येत होतं.
समीर दादा सोबत माझं एक वेगळंच कनेक्शन आहे.
आम्ही डहाणूकर कॉलेजला जायचो तेव्हा आमचे शिक्षक नेहमी सांगायचे — “समीर चौघुले, पुष्कर श्रोत्री ,अनिकेत विश्वासराव… हे डहाणूकरचे स्टार आहेत. Solid काम करायचे. अनेकदा त्यांना Best Actor मिळालय.
तेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल ऐकायचो, त्यांचं काम बघायचो… "
समीर दादांसोबत केलेल्या नाट्यकृतीच्या अनुभवाबाबत तो म्हणाला,
"मला समीर दादा सोबत ‘बिनधास्त पहा' हे नाटक करायला मिळालं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
त्यातला तो काठीचा सीन… आम्ही तो प्रेक्षकांमध्ये बसून नाही, तर विंग मध्ये उभं राहून बघायचो. समीर दादा तो सीन perform करायचा आणि आम्ही बाजूला उभं राहून अक्षरशः enjoy करायचो… आणि त्याचवेळी खूप काही शिकायचो. आज इतक्या वर्षांनी " सम्या सम्या मैफिलीत माझ्या "….हा अडीच तासांचा परफॉर्मन्स बघताना त्या सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर आल्या."
समीर चौघुले यांचं कौतुक करीत प्रथमेशने पुढे लिहिले,
"गेली २५–३० वर्षं हा माणूस विनोद निर्माण करतोय, लिहितोय, perform करतोय… आणि त्या सगळ्या वर्षांची मेहनत आज त्यांच्या सहजतेत दिसते. त्यांचं काम बघताना फक्त हसू येत नाही, तर एका कलाकाराने स्वतःला इतकी वर्षं घडवत नेलंय, याचा अभिमानही वाटतो.
आपण जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा काही नावं आपल्या डोळ्यासमोर असतात. आपण त्यांच्यासोबत काम केलेलं नसतं, पण त्यांचा प्रवास कुठेतरी आपल्याला inspire करत असतो. समीर दादा माझ्यासाठी त्यातलं एक नाव आहे.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे — तो आपल्या डहाणूकरचा आहे.
काल प्रेक्षक म्हणून खूप हसलो… पण आतून एकच भावना होती —
“अरे, हा आपला माणूस आहे… आणि किती भारी काम करतोय!”
समीर दादा, खूप प्रेम, खूप आदर आणि खूप अभिमान.
असंच काम करत रहा आणि आम्हाला inspire करत रहा.
डहाणूकरचा आमचा Superstar!"
या पोस्टवर समीर चौघुले यांनी "काय बोलू, खूप प्रेम पप्या..मित्रा" अशी कमेंट करत आभार व्यक्त केलेत.