दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी सकाळी नवे वळण मिळाले. NEET परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात उपोषण करणारे पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या घडामोडीनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्वतः आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे.अभिजीत दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आजपासून ते उपोषणाला बसत असून 20 जुलै रोजी नियोजित मोर्चाही पूर्वनियोजितप्रमाणे काढण्यात येणार आहे. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवून हे आंदोलन संपेल, असा सरकारचा समज असेल तर तो चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
Abhijeet Dipke; "If they think that taking Sonam Sir away will end this movement, they are mistaken. We will remain here, and will march to Parliament on July 20." pic.twitter.com/GKvaIbcLK9 — Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 18, 2026
दिपके यांनी यावेळी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी अभिजीत दिपके यांनी गंभीर आरोपही केले. आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा तसेच स्वतःवर मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.