Aadhar Card Update: आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! या SDK Software च्या मदतीने आता फेस ऑथेंटिकेशन करणे झाले सुलभ

भारतात आधार कार्ड हा आता सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. नागरिकत्वाची तपासणी ही या कार्डद्वारे कळून येते. त्यामुळे आधार कार्ड अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे. पण याची प्रक्रिया खूप मोठी आणि किचकट

Aadhar Card Update: आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! या SDK Software च्या मदतीने आता फेस ऑथेंटिकेशन करणे झाले सुलभ

भारतात आधार कार्ड हा आता सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. नागरिकत्वाची तपासणी ही या कार्डद्वारे कळून येते. त्यामुळे आधार कार्ड अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे. पण याची प्रक्रिया खूप मोठी आणि किचकट असते. यावर उपाय म्हणून डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. घरबसल्या सर्वच गोष्टी समोर असून सोप्य्या पद्धतीत आधार कार्ड अपडेट करता येते. आता डिजिटल सेवा आणखी सोप्या करण्यासाठी यूआयडीएआयने मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यूआयडीएआयने आधार फेस ऑथेंटिकेशन एसडीके आणि आधार फेस ऑथेंटिकेशन सँडबॉक्स लाँच केला आहे. हे दोन्ही टूल्स 9 सप्टेंबर 2026 रोजी मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये सादर करण्यात आले.

Aadhaar card update मध्ये SDK म्हणजे?
SDK हे एक software/tool package असते, ज्याच्या मदतीने Aadhaar enrollment/update केंद्रावर वापरल्या जाणाऱ्या system मध्ये fingerprint, iris, photo किंवा demographic details यांसारखी माहिती UIDAI च्या प्रणालीशी जोडून प्रक्रिया करता येते.

या नव्या एसडीकेमुळे बँक, फिनटेक कंपन्या, सरकारी विभाग आणि इतर अधिकृत संस्था त्यांच्या स्वतःच्या अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल अ‍ॅपमध्येच आधार फेस ऑथेंटिकेशनची सुविधा जोडू शकणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना पडताळणीसाठी वेगळ्या अ‍ॅपमध्ये जाण्याची किंवा अ‍ॅपमध्ये स्वतः स्कॅन करण्याची मेहनत कमी होणार आहे. यामुळे डिजिटल ऑनबोर्डिंग प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा – Ration Card Update : रेशन कार्डबाबत मोठी अपडेट! 1 ऑक्टोबरपूर्वी 'ही' प्रक्रीया केली नाही, तर तुमचे रेशन कार्ड होईल निष्क्रिय; जाणून घ्या सविस्तर
 

SDK  मध्ये कोणत्या सुविधा?
यूआयडीएआयच्या या एसडीकेमध्ये एआय/एमएल आधारित लाईव्हनेस डिटेक्शन आणि अँटी-स्पूफिंग तंत्रज्ञानाचा समावेश आहे. याशिवाय ऑथेंटिकेशन डेटा सुरक्षितपणे हाताळण्यासाठी एन्क्रिप्शनला सपोर्ट देण्यात आला आहे. हे एसडीके ग्राहकांच्या स्मार्टफोनवर वापरता यावे, यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.

यूआयडीएआयच्या मते, आधार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट, आयुष्मान भारत ऑनबोर्डिंग, डीबीटी, आधार-इनेबल्ड पेमेंट्स, सिम अ‍ॅक्टिव्हेशन आणि विविध सरकारी योजनांमध्ये होत आहे. 2022 मध्ये सुरू झालेल्या या प्रणालीने आतापर्यंत 500 कोटींहून जास्त व्यवहार प्रक्रिया केले असून जवळपास 200 संस्थांनी ती स्वीकारली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number