भारताच्या शेजारील देश बांगलादेश येथे तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तान पाठोपाठ आता बांगलादेशमध्येही भूकंप आल्याने चांगलीच मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने अणु चाचण्या केल्या जात असल्याने भूकंपाचा इशारा काही दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. त्यानंतर आता नबांगलादेशची राजधानी ढाका येथे शुक्रवारी सकाळी अचानक जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले.
समोर आलेल्या माहितीनुसार असं समजं आहे की, शुक्रवारी सकाळी बांगलादेशातील तुंगीपासून सुमारे 27 किलोमीटर पूर्वेला 5.7 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप इतका तीव्र होता की, बंगालपर्यंत त्याचे धक्के जाणवले. एवढचं नव्हे तर या भूकंपानंतर तब्बल 20 सेकंद जमीन हादरली. बंगालमधील मालदा, कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर आणि हुगळी यासह अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
त्रिपुराच्या अनेक भागातही जाणवले. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्क अधिक तीव्र जाणवतात. त्यामुळे बांगलादेशमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्कामुळे पाकिस्तानची जमीनही हादरली. यावेळी पहिला भूकंप पहाटे 1:59 वाजता झाला, ज्याचे केंद्रबिंदू सुमारे 190 किलोमीटर खोलीवर होते. दुसरा, अधिक तीव्र भूकंप पाकिस्तानमध्ये पहाटे 3:09 वाजता जाणवला.
पाकिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या अनेक भागातही जाणवले. त्याचसोबत भारताच्या पश्चिम बंगालमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान युरोपियन-भूमध्य भूकंप केंद्राने दिलेल्या माहितीनुसार अनेक भागातून सौम्य भूकंपाच्या धक्क्यांचे वृत्त आले आहे. मात्र बांगलादेशमध्ये झालेल्या भूकंपामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.