Kolkata Hotel Fire : कोलकात्यातील हॉटेलमध्ये मध्यरात्री भीषण आग; आगीत 9 बांगलादेशी नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

कोलकाता : कोलकात्यातील एका हॉटेलला बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका लहान मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांपैकी एक असलेल्या 'न्यू मार्केट'जवळील 'फ्री स्कूल स्ट्रीट'वर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. यामुळे अनेक जण इमारतीत अडकले. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाने सांगितले की, या आगीत मृत्यू झालेले सर्व नऊ जण बांगलादेशी नागरिक होते. ते […]

Kolkata Hotel Fire : कोलकात्यातील हॉटेलमध्ये मध्यरात्री भीषण आग; आगीत 9 बांगलादेशी नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

कोलकाता : कोलकात्यातील एका हॉटेलला बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका लहान मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांपैकी एक असलेल्या 'न्यू मार्केट'जवळील 'फ्री स्कूल स्ट्रीट'वर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. यामुळे अनेक जण इमारतीत अडकले. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाने सांगितले की, या आगीत मृत्यू झालेले सर्व नऊ जण बांगलादेशी नागरिक होते. ते वैद्यकीय उपचारांसाठी कोलकात्यात आले होते.

प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर वातानुकूलित यंत्राचा (एसी) स्फोट झाल्यामुळे ही लागली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. आग आसपासच्या भागात पसरल्यामुळे हॉटेलच्या खोल्यांमध्ये वेगाने धूर पसरला. यामुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ते तातडीने बाहेर धावले. पहाटे 2.07 वाजता अग्निशमन दलाला या आगीची माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच, आपत्ती व्यवस्थापन पथकानेही घटनास्थळी पोहोचून बचावकार्यात सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम केले. काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले.

हेही वाचा : Pune Junnar Crime : पुण्यात पुन्हा नसरापूरची पुनरावृत्ती! चिमुरडीचे शेतात नेऊन लचके तोडले; सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला भयंकर प्रकार

"दाट धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना जिना चढून वरच्या मजल्यांवर जाणे कठीण झाले होते. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे," अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिली. "अडकलेल्यांची सुटका करणे आणि आगीचे कारण शोधणे हे आमचे प्राधान्य आहे. आग विझवण्यात आली असून सध्या 'कूलिंग'ची प्रक्रिया (तापमान कमी करण्याची प्रक्रिया) सुरू आहे," असेही त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांतच कोलकातामधील हॉटेलला आग लागण्याची ही घटना घडली आहे. 17 ऑगस्टच्या पहाटे तारापीठ येथील 'हॉटेल विदेशिनी'मध्ये लागलेल्या आगीत किमान आठ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. पाच मजली हॉटेलच्या तळमजल्यावर पहाटे साडेचारच्या सुमारास ही आग लागली, त्यावेळी बहुतेक पाहुणे गाढ झोपेत होते. हे हॉटेल तारापीठ मंदिरालगतच्या पवित्र तलावाशेजारी स्थित आहे. या आगीत मेघालयातील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number