मुंबई : मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पात अडथळा ठरणारी १४९ बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली. शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाने पाडकाम करण्यास परवानगी दिल्यानंतर 'एल' विभागाने सांताक्रूझ–चेंबूर रस्त्यालगत ही कारवाई केली. यामुळे मिठी परिसरातील सुमारे आठ हजार चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त झाले. परिणामी, मिठी नदी रुंदीकरणासाठी ३०० मीटर रुंदीचे क्षेत्र उपलब्ध झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.