दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन-ऑफलाईन घेण्याबाबत विदयार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम होता. मात्र, राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीची परीक्षा कधी? दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. […]

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन-ऑफलाईन घेण्याबाबत विदयार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम होता. मात्र, राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावीची परीक्षा कधी?

दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तर प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान होणार आहे.

बारावीची परीक्षा कधी?

बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्चदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तर प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान होणार आहे.

तसेच कोरोनामुळे जे विद्यार्थी तोंडी किंवा लेखी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे.

परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन होणार असून विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण अनिवार्य नसेल. तसेच विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांमध्येच विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असणार आहे. सकाळी ११:३० वाजता परीक्षा सुरू होणार असून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळणार आहे. तसेच कोरोनामुळे पेपर हुकल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात येणार असून एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थ्यांना एक सोडून एक पद्धतीने बसवण्यात येईल. तसेच शाळेतील शिक्षकच परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तर जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number