Bharat Taxi: देशातील कॅब प्रवाशांना आणि चालकांना मोठा दिलासा देण्यासाठी नवीन वर्षात भारत टॅक्सी (Bharat Taxi) या नवीन कॅब सेवेचा शुभारंभ झाला आहे. केंद्र सरकारच्या पूर्ण पाठिंब्याने सुरू झालेली ही सेवा ओला आणि उबरसारख्या कंपन्यांच्या जाचक अटींपासून सर्वसामान्यांची सुटका करणार आहे.
चालकांना मिळणार पूर्ण मालकी हक्क
भारत टॅक्सी हे Zero-Commission (शून्य-कमिशन) तत्त्वावर चालणारे प्लॅटफॉर्म आहे. याचा अर्थ, प्रवाशाने दिलेली संपूर्ण रक्कम थेट चालकाच्या खिशात जाईल. खाजगी कंपन्यांप्रमाणे चालकांना आपल्या कमाईतील मोठा हिस्सा कमिशन म्हणून द्यावा लागणार नाही. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, नोएडा आणि गुरुग्राम या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे.
'निश्चित किंमत' पद्धत; वाढीव भाड्याला लगाम
ओला आणि उबरकडून अनेकदा पाऊस, वाहतूक कोंडी किंवा 'पीक आवर्स'चे कारण देऊन अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. मात्र, भारत टॅक्सी "निश्चित किंमत" (Fixed Price) पद्धतीवर चालेल. तुम्ही केवळ प्रवास केलेल्या अंतरासाठीच पैसे द्याल, परिस्थिती कोणतीही असली तरी भाडे अचानक वाढवले जाणार नाही.
असे असेल भाड्याचे गणित
भारत टॅक्सीचे मोबाइल अॅप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यामध्ये एसी आणि नॉन-एसी अशा दोन्ही कॅबचा पर्याय मिळेल. भाड्याचे दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:
सुरुवातीचे 4 किमी: 30 रुपये (निश्चित भाडे)
4 किमी ते 12 किमी पर्यंत: 23 रुपये प्रति किमी
12 किमीच्या पुढे: 18 रुपये प्रति किमी
उदाहरणार्थ 12 किमी प्रवासासाठी: पहिल्या 4 किमीचे 30 रुपये आणि पुढील 8 किमीचे (23 रुपया प्रमाणे) 184. अशा प्रकारे एकूण भाडे 214 रुपये होईल. तथापी, 15 किमी प्रवासासाठी पहिल्या 4 किमीचे 30 रुपये आणि पुढील 11 किमीचे (18 रुपया प्रमाणे) 198. अशा प्रकारे एकूण खर्च 228 रुपये होईल. तथापी, भारत टॅक्सीमुळे कॅब चालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून, प्रवाशांनाही स्वस्त आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.