Maharashtra School Result Rules 2026 : 1 मे रोजी निकाल; शालेय निकालाचा नवा पॅटर्न! आता प्रगतीपुस्तकासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार; आणि…

शैक्षणिक वर्ष 2025−26 चा निकाल 01 मे 2026 रोजी जाहीर होणार असून, यंदापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यासोबतच त्यांनी लिहिलेली उत्तरपत्रिकाही दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Maharashtra School Result Rules 2026 : 1 मे रोजी निकाल; शालेय निकालाचा नवा पॅटर्न! आता प्रगतीपुस्तकासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार; आणि…

Maharashtra School Result Rules 2026 : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन प्रक्रियेत एक क्रांतीकारी बदल घडवून आणला आहे. शैक्षणिक वर्ष 2025−26 चा निकाल 01 मे 2026 रोजी जाहीर होणार असून, यंदापासून विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिका (Report Card) देऊन चालणार नाही. शाळांना आता विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका पालकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला असून, यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

नव्या नियमावलीचे मुख्य पैलू
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या उद्दिष्टांना अनुसरून त्यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ..

– उत्तरपत्रिका दाखवणे अनिवार्य: पालकांना आपल्या पाल्याने परीक्षेत नेमके काय लिहिले आहे आणि चुका कुठे झाल्या आहेत, हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
– नियम सर्व शाळांना लागू: हा नियम राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळांसाठी बंधनकारक असेल.
– सुट्ट्यांचे वेळापत्रक: 01 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर, 02 मे 2026 पासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी अधिकृतपणे सुरू होईल.
– आकलनावर भर: केवळ गुणांच्या शर्यतीत न पडता विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्य आणि विश्लेषणात्मक क्षमतेचे मूल्यांकन करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे.

हेही वाचा – HSC Exam Result: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार! लवकरच लागणार निकाल, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहाल?

पालक आणि विद्यार्थ्यांसाठी होणारे फायदे
या निर्णयामुळे पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद अधिक वाढणार आहे. उत्तरपत्रिका हातामध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या विषयात अधिक सरावाची किंवा मार्गदर्शनाची गरज आहे, हे पालकांना सहज ओळखता येईल. केवळ 'फेल' किंवा 'पास' या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजू समजून घेण्याची संधी पालकांना मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष 2026−27 ची सुरुवात अधिक चांगल्या तयारीत व्हावी, यासाठी निकालासोबतच हा पारदर्शक बदल यंदापासून अमलात आणला जात आहे.

हेही वाचा – Career In Data Science: IT क्षेत्रातील सर्वात 'डिमांडिंग' करिअर! डेटा सायंटिस्ट म्हणजे नक्की काय? करिअर करण्यासाठी वाचा 'A To Z' माहिती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version