मुंबई : सरकारने मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर मंत्र्यांचे बंगले आणि सरकारी वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करू, असा थेट इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. शेतकरी प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी आंदोलन पुकारले आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या –
* शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, ही प्रमुख मागणी.
* नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 2 लाख प्रोत्साहन अनुदान द्यावे.
* आयटीआर भरणारे आणि पुनर्गठित कर्ज असलेले शेतकरी यांनाही कर्जमाफीच्या कक्षेत आणावे.
* 2017 आणि 2019 च्या कर्जमाफीपासून वंचित पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा. पात्र मृत शेतकऱ्यांच्या वारसांचाही समावेश करावा.
* OTS मुळे शेतकऱ्यांचा CIBIL स्कोअर खराब होणार नाही, याबाबत स्पष्टता व हमी द्यावी.
* सरकारने मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास मंत्र्यांचे बंगले आणि सरकारी वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करण्याचा इशारा तुपकरांनी दिला होता.
* 27 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तसेच कार्यकर्त्यांचीही धरपकड झाली.
* तुपकरांनी पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलनाची भूमिका कायम ठेवली, 27 ऑगस्टला मंत्रालय परिसरात आंदोलन झाले.