PM Matru Vandana Yojana: आता गर्भवती महिलांना मिळणार 11,000 रुपये; PMMVY योजनेसाठी कसा करायचा अर्ज?

या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात 11,000 रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
PM Matru Vandana Yojana: आता गर्भवती महिलांना मिळणार 11,000 रुपये; PMMVY योजनेसाठी कसा करायचा अर्ज?

PM Matru Vandana Yojana: देशभरातील गर्भवती महिलांना मोदी सरकारच्या आर्थिक मदतीच्या योजनांमुळे मोठा फायदा होत आहे. यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY). या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात 11,000 रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. जर तुम्ही अद्याप याचा लाभ घेतला नसेल, तर लवकर अर्ज करून हा मदत निधी मिळवणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना म्हणजे काय?

PMMVY ही केंद्र सरकारची योजना आहे, जी गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेते. योजना थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीवर आधारित आहे, ज्यामुळे निधी थेट महिलांच्या खात्यात जमा होतो. या योजनेचा उद्देश महिलांना पोषण, आरोग्य तपासणी आणि सुरक्षित प्रसूतीची सुविधा सुनिश्चित करणे आहे.

हेही वाचा – New Gratuity Rule: आता, 5 वर्षांच्या सेवेसाठी नव्हे तर फक्त एका वर्षाच्या सेवेसाठीही मिळणार ग्रॅच्युइटी; कोणाला होणार फायदा?

दोन टप्प्यांत दिली जाते आर्थिक मदत  

पहिल्या मुलासाठी 5 हजार  ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता, आरोग्य तपासणी पूर्ण केल्यानंतर दुसरा हप्ता आणि मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि लसीकरण नोंदी सादर केल्यानंतर तिसरा हप्ता. गर्भधारणेदरम्यान पोषण, आरोग्य तपासणी, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी हे पैसे दिले जातात. दुसरे मूल मुलगी असल्यास 6 हजार रुपये दिले जातात. ज्यामुळे एकूण रक्कम 11 हजार होते.

हेही वाचा – Bank of India Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी भरती; कशी असेल निवड प्रक्रिया?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmmvy.wcd.gov.in ला भेट द्या.
ऑनलाइन अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: ओळखपत्र, बँक पासबुक, रेशन कार्ड, गर्भधारणेचा वैद्यकीय अहवाल.
महिला किमान 19 वर्षांची असावी.
मुलाच्या जन्मानंतर 270 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक.
 
योजनेचा फायदा

देशभरात लाखो महिलांनी PMMVY योजनेतून लाभ घेतला आहे. या योजनेमुळे गर्भवती महिलांना केवळ आर्थिक मदत मिळालेली नाही तर या योजनेमुळे त्यांना सुरक्षित प्रसूती, योग्य पोषण आणि वेळेवर वैद्यकीय तपासणीचाही लाभ मिळाला आहे. सरकारच्या या योजनेमुळे महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version