Mutual Fund Investment : डायरेक्ट (Direct) आणि रेगुलर (Regular) म्युच्युअल फंडामध्ये काय फरक आहे? गुंतवणूक करण्याआधी समजून घ्या

डायरेक्ट आणि रेग्युलर म्युच्युअल फंडामध्ये काही मुख्य फरक असतात. कोणतीही गुंतवणूक करताना त्यासंबंधी पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.
Mutual Fund Investment : डायरेक्ट (Direct) आणि रेगुलर (Regular) म्युच्युअल फंडामध्ये काय फरक आहे? गुंतवणूक करण्याआधी समजून घ्या

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Fund) गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे दोन मुख्य प्रकार, डायरेक्ट (Direct) आणि रेग्युलर (Regular), यातील फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. डायरेक्ट म्युच्युअल फंड सध्या जास्त लोकप्रिय होत असले तरी, प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्यासाठी नेमका कोणता पर्याय योग्य आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

डायरेक्ट आणि रेग्युलर म्युच्युअल फंड म्हणजे काय?
डायरेक्ट म्युच्युअल फंड (Direct Mutual Funds): या योजना गुंतवणूकदार थेट ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) म्हणजेच फंड हाऊसकडून खरेदी करतात. यामध्ये कोणताही मध्यस्थ किंवा एजंट नसतो. गुंतवणूकदार AMC च्या वेबसाइट/ॲपद्वारे ऑनलाइन किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन ऑफलाइनही गुंतवणूक करू शकतात. एजंट नसल्यामुळे गुंतवणूकदारांना कमी खर्च अनुपात (Expense Ratio) लागतो, ज्यामुळे रिटर्न (Return) जास्त मिळतो.

रेग्युलर म्युच्युअल फंड (Regular Mutual Funds): या योजना गुंतवणूकदार डिस्ट्रीब्यूटर, ब्रोकर किंवा फायनान्शियल ॲडव्हायझरच्या माध्यमातून खरेदी करतात. हे विशेष तज्ज्ञ आपल्या ज्ञानाच्या आधारावर योग्य फंड निवडायला मदत करतात. या सेवेसाठी ते कमिशन किंवा सेवा शुल्क आकारतात, जे फंड हाऊसकडून दिले जाते आणि ते शेवटी गुंतवणूकदाराच्या खर्चात जोडले जाते. त्यामुळे रेग्युलर फंड करताना हा खर्च गुंतवणूकदाराला अधिकचा करावा लागतो, जो डायरेक्ट फंडपेक्षा जास्त असतो.

हेही वाचा – Life Certificate for NRI Pensioners : परदेशात राहणाऱ्या पेन्शनधारकांनी असे जमा करावे 'जीवन प्रमाणपत्र', अन्यथा थांबू शकते पेन्शन

मुख्य फरक आणि ओळख
डायरेक्ट आणि रेग्युलर म्युच्युअल फंडामध्ये खालीलप्रमाणे मुख्य फरक असतात:
– खर्चाचं प्रमाण (Expense Ratio): डायरेक्ट फंडमध्ये एजंट नसल्याने खर्च अनुपात कमी असतो आणि गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न मिळतो. रेग्युलर फंडमध्ये कमिशनमुळे खर्चाचं प्रमाण 0.5 टक्के ते 1 टक्केपर्यंत जास्त असतो.
– मध्यस्थ (Intermediary): डायरेक्ट फंडमध्ये गुंतवणूकदार थेट AMC कडे जातो, तर रेग्युलर फंडमध्ये एजंट/डिस्ट्रीब्यूटर असतो.
– रिटर्न (Return): कमिशन कट होत नसल्याने डायरेक्ट फंडचा रिटर्न रेग्युलर फंडपेक्षा जास्त असतो.
– NAV: खर्च अनुपात जास्त असल्याने रेग्युलर फंडचा नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) डायरेक्ट फंडपेक्षा थोडा कमी असतो.
– कसं ओळखाल : फंडच्या नावात “Direct” (डायरेक्ट) किंवा “Dir” (डिर) लिहिले असल्यास तो डायरेक्ट फंड असतो. “Regular” (रेग्युलर) किंवा “Reg” (रेग) लिहिले असल्यास तो रेग्युलर फंड असतो. तुमच्या अकाउंट स्टेटमेंटमध्ये (CAS) ॲडव्हायझर किंवा ARN नंबर असल्यास तो रेग्युलर फंड असतो.

तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य?
डायरेक्ट आणि रेग्युलर फंडमधील मुख्य फरक एजंटची मदत घेणे आणि  त्यासाठी होणारा खर्च हा आहे.
डायरेक्ट फंड कधी निवडावा: जर तुम्हाला बाजाराचे चांगले ज्ञान असेल आणि स्वतः समजून आणि अभ्यास करून तुम्ही कुठे-कशी गुंतवणूक करावी, हे निवडू शकत असाल, तसेच तुमचे केवायसी (KYC) अपडेटेड असेल, तर डायरेक्ट फंड निवडा. यात खर्च कमी आणि नफा जास्त मिळतो.

रेग्युलर फंड कधी निवडावा: जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल किंवा गुंतवणुकीतील बारकावे माहीत नसतील, तर रेग्युलर फंड चांगला आहे. यामध्ये अनुभवी सल्लागार तुम्हाला योग्य फंड निवडण्यात आणि पोर्टफोलिओ (Portfolio) सांभाळण्यात मदत करतात.
तुम्ही कोणत्या पर्यायात गुंतवणूक करता, हे तुमच्या भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी महत्त्वाचे आहे. सुरुवातीला लहान रकमेने गुंतवणूक सुरू करा आणि दोन्ही पर्याय तुमच्या गरजेनुसार योग्य आहेत की नाही हे तपासा.

हेही वाचा – SBI Shut Down Service: 1 डिसेंबरपासून SBI बंद करणार 'ही' महत्त्वाची सुविधा; लाखो ग्राहकांवर होणार परिणाम

(Disclaimer :  शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version