Moga GST Notice: रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या मजूराला आयकर विभागाने पाठवली 35 कोटींची कर नोटीस; नेमकं काय घडलं?

रोजंदारीवर काम करणाऱ्या अजमेर सिंग या मजुराला जीएसटी विभागाकडून तब्बल 35 कोटी रुपयांची कर नोटीस पाठवण्यात आली आहे.
Moga GST Notice: रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या मजूराला आयकर विभागाने पाठवली 35 कोटींची कर नोटीस; नेमकं काय घडलं?

Moga GST Notice: पंजाबच्या मोगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या अजमेर सिंग या मजुराला जीएसटी विभागाकडून तब्बल 35 कोटी रुपयांची कर नोटीस पाठवण्यात आली आहे. साध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या मजुराला एवढ्या प्रचंड कराची नोटीस मिळताच गावात आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कोविड काळात घेतले कागदपत्र  

अजमेर सिंगच्या मते, कोविड-19 च्या काळात काही लोकांनी त्याला मदत करण्याच्या नावाखाली त्याचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या फोटोकॉपी घेतल्या होत्या. त्याच कागदपत्रांचा वापर करून पुढे मोठी गैरव्यवहाराची साखळी सुरू झाली, असा त्याचा आरोप आहे.

2022 मध्येही मिळाली होती नोटीस

ही पहिली घटना नाही. अजमेर सिंगला 2022 मध्ये 21 लाख रुपयांची नोटीस मिळाली होती. त्यावेळीही त्याने तक्रार केली, परंतु योग्य कारवाई न झाल्याने आता त्याच्यावर आणखी मोठा आर्थिक भार पडला.  

हेही वाचा – खड्डे बुजवले पण रस्त्यावरचं डांबर आलं चक्क हातात…; रस्ता दुरूस्तीनंतरचा व्हिडीओ समोर, नागरिकांचा संताप

बनावट कंपनी ‘सीके इंटरनॅशनल’ उघडकीस

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अजमेर लुधियाना जीएसटी कार्यालयात पोहोचला असता त्याला धक्कादायक माहिती मिळाली. त्याच्या आधार आणि पॅन नंबरचा वापर करून ‘CK International’ नावाची बनावट कंपनी सुरू करण्यात आली होती. या कंपनीच्या नावाने कोट्यवधींचे व्यवहार झाले. अजमेर सिंगचा दावा आहे की त्याने कधीही पॅन कार्डच घेतले नाही, त्यामुळे या फसवणुकीचे स्वरूप अधिक गंभीर मानले जात आहे.

हेही वाचा – Most Expensive Potato : बापरे!! 1 किलो बटाट्याची किंमत 1 लाख रुपये; खरेदीसाठी लोक लावतात चक्क रांगा

35 कोटींची कर नोटीस 

अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, अजमेरच्या ओळखीचा वापर करून जीएसटी क्रमांक मिळवण्यात आला आणि कंपनीला वैध स्वरूप देण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून जीएसटीचा भलेमोठा बोजा एका मजुराच्या नावावर टाकण्यात आला. याच आधारावर जीएसटी विभागाने अजमेर सिंगच्या घरी 35 कोटींच्या थकबाकीची नोटीस पाठवली. दरम्यान, अजमेर सिंगने या फसवणुकीबाबत पोलिसात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आधार आणि ओळखपत्रांचा गैरवापर करून होणाऱ्या फसवणुकीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version