Mumbai News : स्वच्छ मुंबईसाठी पालिकेचा कठोर निर्णय! अस्वच्छता केलात तर खिसा होणार रिकामा; 250 ते 25 हजारांपर्यंत होणार दंड

सार्वजनिक जागांवरील अस्वच्छतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शहर सुंदर बनवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे.

Mumbai News : स्वच्छ मुंबईसाठी पालिकेचा कठोर निर्णय! अस्वच्छता केलात तर खिसा होणार रिकामा; 250 ते 25 हजारांपर्यंत होणार दंड

शहरातील स्वच्छतेबाबत शिस्त आणण्यासाठी मुंबई महापालिकेने नव्या आणि कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. सार्वजनिक जागांवरील अस्वच्छतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शहर सुंदर बनवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मुंबईत रस्त्यावर कुठेही थुंकलात किंवा घाण केली तर आता पुन्हा दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमिवर शहरात 350 हून अधिक ज्युनियर सुपरवायझरची नियुक्ती यावेळी करण्यात आली आहे.

हेही वाचा- BMC On Waterlogging : मान्सूनसाठी महापालिका सज्ज! मुंबईत 400 ठिकाणी केल्या उपाययोजना; तर यंदा 100 ठिकाणी पाणी तुंबण्याचा केला दावा

हे सर्व सुपरवायझर शहरभर 24 वॉर्डमध्ये तैनात असणार आहेत. यावेळी उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे. यादरम्यान रस्त्यावर थुंकल्यास 250 रुपये दंड तर कचरा फेकल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याचसोबत विनापरवाना राडारोड्याची वाहतूक आढळल्यास तब्बल 25 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

पूर्वीचे ‘क्लीनअप मार्शल’ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून दादागिरी व भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईसाठी ‘न्यूसेंस डिटेक्टर’ सेवेत आणण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा फेकणे, राडारोड्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेची कडक कारवाई होणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number