RBI New Deputy Governor: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी शिरीष चंद्र मुर्मू यांची नियुक्ती

केंद्र सरकारने शिरीष चंद्र मुर्मू यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते 9 ऑक्टोबर 2025 पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी पदभार स्वीकारणार आहेत.
RBI New Deputy Governor: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी शिरीष चंद्र मुर्मू यांची नियुक्ती

RBI New Deputy Governor: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला नवीन डेप्युटी गव्हर्नर मिळाले आहेत. केंद्र सरकारने शिरीष चंद्र मुर्मू यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते 9 ऑक्टोबर 2025 पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते आरबीआयचे कार्यकारी संचालक असून पर्यवेक्षण विभागाची जबाबदारी सांभाळतात.

एम. राजेश्वर राव यांचा कार्यकाळ संपणार

मुर्मू यांची नियुक्ती एम. राजेश्वर राव यांच्या जागी करण्यात आली आहे. राव यांचा कार्यकाळ 8 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे 9 ऑक्टोबरपासून शिरीष चंद्र मुर्मू अधिकृतरीत्या या पदावर रुजू होणार आहेत.

हेही वाचा – Gold-Silver Price Today: दसऱ्यापूर्वी सोनं-चांदीच्या किमतीत मोठी वाढ, आजचे दर जाणून घ्या

आरबीआयचे चार डेप्युटी गव्हर्नर

भारतीय रिझर्व्ह बँकेत एकूण चार डेप्युटी गव्हर्नर असतात. ते चलनविषयक धोरण, वित्तीय बाजार नियमन, बँकिंग पर्यवेक्षण आणि नियमन यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये कार्य करतात. सध्या एम. राजेश्वर राव, स्वामीनाथन जानकिरामन, पूनम गुप्ता आणि टी. रबी शंकर हे या पदावर कार्यरत आहेत. राव यांची जागा आता शिरीष चंद्र मुर्मू घेणार आहेत.

हेही वाचा – Shrikant Badve: एका मराठी माणसाचा सामान्यपासून ते असामान्य बनण्यापर्यंतचा प्रवास! जाणून घ्या, कोण आहेत श्रीकांत बडवे?

मुर्मू यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या

आरबीआयच्या अधिकृत माहितीनुसार, कार्यकारी संचालक म्हणून मुर्मू हे संस्थेतील वरिष्ठ निरीक्षण, उच्च-स्तरीय प्रशासकीय निर्णय, नियामक धोरण आणि विभागीय समन्वय अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. तसेच, प्रशासनाशी संबंधित बाबी, नियामक अनुपालन आणि अंतर्गत व्यवस्थापन यामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. या नियुक्तीनंतर मध्यवर्ती बँकेच्या कार्यप्रणालीत सातत्य आणि नियामक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version