आतापर्यंत महिलांची छेड काढणाऱ्यांना चोप देताना तुम्ही पाहिलं असेल. पण एका पॅसेंजर रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणीने गांधीगिरी पद्धतीने धडा शिकवला आहे. ‘अकोला-बडनेरा’ रेल्वेत छेड काढणाऱ्या छेड काढणाऱ्या रोमियोच्या तरुणीने अद्दल घडवली आहे. अकोला-बडनेरा रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात तरुणीने बांगड्या भरवल्या.
इतकंच नव्हे तर ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावत त्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शेगाववरून बडनेराकडे येणाऱ्या ‘भुसावळ-वर्धा पॅसेंजर मेमो’ ट्रेनमध्ये एका तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला चक्क तरुणीने आणि प्रवाशांनी मिळून गांधीगिरी स्टाईलने चांगलाच धडा शिकवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी तरुणीच्या संयमाचे आणि धाडसाचे कौतुक केले आहे.