Supreme Court: ‘न्यायालयाचा वेळ अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवू नका’; पोलिस अत्याचाराबाबतची याचिका ऐकण्यास सरन्यायाधीशांचा नकार

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरील पोलिस कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विधानामुळे पुन्हा या आंदोलनाची चर्चा रंगली आह

Supreme Court: ‘न्यायालयाचा वेळ अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवू नका’; पोलिस अत्याचाराबाबतची याचिका ऐकण्यास सरन्यायाधीशांचा नकार

दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून, त्यावरील सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या टिप्पणीची देशभर चर्चा सुरू झाली आहे. आंदोलकांवर दिल्ली पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईविरोधात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला.

याचिकाकर्त्याने न्यायालयासमोर असा दावा केला की, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. न्यायालयाने हे व्हिडिओ पाहून स्वतःहून या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत न्यायालयाकडे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचे सांगितले. तसेच न्यायालयाचा आणि स्वतःचा वेळ अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवू नये, असा सल्लाही त्यांनी याचिकाकर्त्याला दिला.

हेही वाचा: Aditya Thackeray : क्रूर दडपशाही आणि विद्यार्थ्यांच्या अटकेच्या विरोधात निषेध मोर्चा; ‘वन नेशन, वन इमोशन’च्या अंतर्गत आदित्य ठाकरेंनी केले आंदोलनाचे आयोजन

दरम्यान, दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या घटनांनंतर विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा मुद्दा न्यायालयात नेण्यात आला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी नाकारल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. न्यायालयाच्या भूमिकेवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, आंदोलनाची चर्चा आणखी तीव्र झाली आहे.

विशेष म्हणजे, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे काही महिन्यांपूर्वीचे एक विधान पुन्हा चर्चेत आले आहे. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. त्या विधानावरून सामाजिक आणि राजकीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

हेही वाचा: Preity Zinta Tweet: ‘विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे, पण देशविरोधी…’; प्रीती झिंटाने व्यक्त केली मोठी चिंता, पोस्ट व्हायरल

मात्र, त्याच काळात राजकीय रणनीतीकार अभिजीत दिपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची घोषणा केली. त्यानंतर अल्पावधीतच या संघटनेला अनेक तरुणांचा प्रतिसाद मिळू लागला. विशेषतः विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांचा सहभाग वाढत गेला. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात हजारो तरुण सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या भूमिकेनंतर CJP आंदोलन, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पोलिस कारवाई या तिन्ही मुद्द्यांवर पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत या आंदोलनाची दिशा आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे घडणाऱ्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number