Leh Ladakh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; संघर्षात 4 जणांचा मृत्यू, प्रतिबंधात्मक आदेश लागू

चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तथापी, लेहमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
Leh Ladakh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; संघर्षात 4 जणांचा मृत्यू, प्रतिबंधात्मक आदेश लागू

Leh Ladakh Protest: लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी लेहमध्ये विद्यार्थ्यांनी सोमवारी हिंसक आंदोलने केली. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालयाला आग लावली तसेच सीआरपीएफच्या वाहनाला जाळून टाकले. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून आंदोलकांचा पोलिसांशी संघर्ष झाला. या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तथापी, लेहमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. 

या आंदोलनामागे लडाखमधील सामाजिक व पर्यावरणीय प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या सोनम वांगचुक यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. वांगचुक यांनी नुकतेच 15 दिवसांचे उपोषण संपवले असून त्यांनी तरुणांना हिंसाचार टाळण्याचे आवाहन केले आहे. संघर्षात जीवितहानी झाली तर कोणतेही उपोषण यशस्वी ठरत नाही. प्रशासनाने अश्रुधुराचा वापर करू नये, असे आवाहनही वांगचुक यांनी केले आहे. 

हेही वाचा – Rajya Sabha By Election: जम्मू-काश्मीरमधील राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 4 जागांसाठी 24 ऑक्टोबर रोजी होणार मतदान

दरम्यान, लेह जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बीएनएसएसच्या कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. या कलमानुसार पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक, रॅली अथवा मोर्चाला परवानगी दिली जाणार नाही. सार्वजनिक शांतता बिघडवणारे वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.

हेही वाचा – Digital Arrest : ईडी-सीबीआय अधिकारी असल्याचं भासवत बँकरला लुबाडल; तब्बल २३ कोटींची केली लूट

दरम्यान, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालयाबाहेरही तोडफोड केली. त्यांच्या मागण्यांवरून स्पष्ट दिसते की, लडाखमधील तरुण आपला आवाज बुलंद करण्यास ठाम आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा हीच विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे. सोनम वांगचुक या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ युवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या निदर्शनांमुळे संपूर्ण प्रदेशात तणावाचे वातावरण पसरले असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version