Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे 200 हून अधिक जण बेपत्ता, आतापर्यंत 130 लोकांची सुटका

या नैसर्गिक आपत्तीमुळे 200 हून अधिक नागरिक बेपत्ता झाले असून, आतापर्यंत 130 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. धाराली आणि सुखी टॉप परिसरात ढगफुटीची घटना घडली.
Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे 200 हून अधिक जण बेपत्ता, आतापर्यंत 130 लोकांची सुटका
Edited Image

Uttarkashi Cloudburst Update: उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या ढगफुटीमुळे मोठा हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे 200 हून अधिक नागरिक बेपत्ता झाले असून, आतापर्यंत 130 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. धाराली आणि सुखी टॉप परिसरात ढगफुटीची घटना घडली असून, अनेक घरे, दुकाने, रस्ते आणि बाजारपेठा पूर्णपणे वाहून गेल्याची माहिती आहे.

लष्कर आणि हेलिकॉप्टर्स तैनात – 

बचाव आणि मदत कार्यासाठी भारतीय लष्कराने मोर्चा घेतला असून, Mi-17 V5, ALH आणि चित्ता प्रकारची हेलिकॉप्टर्स घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. हवामान अतिशय खराब असल्यामुळे आणि सततच्या पावसामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

हेही वाचा – भारतात आतापर्यंत कितीवेळा ढगफुटी झाली? विनाशकारी ढगफुटीच्या घटनांमध्ये गेला ''इतक्या'' लोकांचा जीव

धाराली गावात घडलेल्या या भयावह घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पुराच्या पाण्यात वाहून जात असलेली घरे आणि दुकानांचे दृश्यं अंगावर शहारे आणणारे आहे. या घटनेने स्थानिक रहिवासी आणि संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.

प्रशासन सतर्क –  

राज्य सरकार आणि एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या असून, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. तथापी, त्यांनी गरजूंना तातडीची मदत आणि निवारा देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – Uttarkashi Cloudburst Viral Video: भयानक आपत्तीत चमत्कार! ढगफुटीच्या घटनेतून वाचलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ आला समोर

हवामान खात्याचा अलर्ट – 

हवामान खात्याने उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये अजूनही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तथापी, नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तथापी, बचाव कार्याला गती देण्यासाठी आणि समन्वय स्थापित करण्यासाठी, सरकारने तीन अतिरिक्त आयएएस अधिकारी तैनात केले आहेत. तसेच पोलिस अधिकारी देखील पाठवण्यात आले आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version