Heavy Rain IMD Alert : मुसळधार पावसाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत 7 जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

झारखंड : गेल्या 24 तासांत झारखंडमध्ये ठिकठिकाणी पडलेल्या विजांमुळे मोठा हाहाकार उडाला असून, विविध जिल्ह्यांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि आठ वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस, 1 आणि 2 जुलैला झारखंडच्या काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजा चमकण्याची शक्यता वर्तवत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. याव्यतिरिक्त, रांची, बोकारो, धनबाद आणि खुंटीसह […]

Heavy Rain IMD Alert : मुसळधार पावसाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत 7 जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

झारखंड : गेल्या 24 तासांत झारखंडमध्ये ठिकठिकाणी पडलेल्या विजांमुळे मोठा हाहाकार उडाला असून, विविध जिल्ह्यांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि आठ वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस, 1 आणि 2 जुलैला झारखंडच्या काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजा चमकण्याची शक्यता वर्तवत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. याव्यतिरिक्त, रांची, बोकारो, धनबाद आणि खुंटीसह मध्य झारखंडसाठी पावसाचा 'येलो अलर्ट'ही देण्यात आला आहे. राजधानी रांचीमध्ये पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, दिवसातून एक-दोनदा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रांचीमधील अंगारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतात नांगरणी करत असताना एका 26 वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख त्याच गावातील रहिवासी असलेल्या भागीरथ महतो अशी पटली आहे. बोकारोचे एसडीपीओ (SDPO) राजीव रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाउन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोकारो विमानतळाजवळील एका झाडाखाली आश्रय घेतलेल्या 19 वर्षीय आलोक कुमार तुरीचाही मृत्यू झाला.

हेही वाचा : EL nino Impact: 100 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; शतकभरातील तिसरा सर्वात कोरडा महिना ठरला जून; 'एल निनो'च्या वाढत्या प्रभावामुळे अर्थव्यवस्था संकटात

दरम्यान, पलामूमध्ये गुरे चारत असताना वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडेलवा गावातील रहिवासी असलेल्या राजू यादव (वय 27) अशी मृताची ओळख पटल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, हजारीबागच्या इचक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुत्रा गावात शोभा देवी या महिलेचाही मृत्यू झाला. शोभा या आपल्या चार मुलांना परत आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. ही मुले घराच्या जवळच जांभूळ गोळा करत होती. त्याच वेळी त्यांच्यावर वीज पडली. लातेहारच्या गणेशपूर गावात वीज पडून तेजनी देवी (वय 45) या महिलेचा मृत्यू झाला. देवघर जिल्ह्यात, जसीडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोइरिडीह गावात घराबाहेर खेळत असताना वीज पडल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान, दुमका येथील रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाडी गावात एका 20 वर्षांच्या तरुणीवर वीज पडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number