Rupee Depreciation : एका डॉलरसाठी आता तब्बल 90 रुपये मोजावे लागणार! तरीही, RBI ची ‘हस्तक्षेप न करण्याची’ भूमिका कायम

मागील वर्षभरात भारतीय रुपयात 5.08 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. भारतीय रुपया आशियाई चलनात सर्वात खराब कामगिरी करणारी दुसऱ्या क्रमांकाचे चलन बनला आहे.
Rupee Depreciation : एका डॉलरसाठी आता तब्बल 90 रुपये मोजावे लागणार! तरीही, RBI ची ‘हस्तक्षेप न करण्याची’ भूमिका कायम

Rupee Depreciation : अमेरिकेच्या डॉलरच्या (US Dollar) तुलनेत भारतीय रुपयाने (Indian Rupee) 3 डिसेंबरला आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली. इक्विटी बाजारातून सतत होणारा आउटफ्लो (Outflow) आणि भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल असलेली अनिश्चितता (Uncertainty aboy Indo-US Trade Deal) यामुळे रुपयाने 90 चा आकडा ओलांडला आहे. चलनातील या तीव्र घसरणीमुळे चिंता वाढली असली तरी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मात्र सीमित हस्तक्षेपाचे धोरण कायम ठेवणार असल्याची भीती चलन तज्ज्ञांना  वाटत आहे.

RBI च्या हस्तक्षेपावर तज्ज्ञांची मतभिन्नता
इंडिया फॉरेक्स ॲसेट मॅनेजमेंट (IFA ग्लोबल) चे संस्थापक आणि CEO अभिषेक गोयंका यांनी सांगितले की, RBI सध्या हस्तक्षेप करण्यासाठी 'मऊ' दृष्टिकोन ठेवत असल्याचे दिसते. कारण त्यांच्याकडे NDF (Non-Deliverable Forward) सह फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्सची (Forward Contracts) आधीच कमतरता आहे. त्यामुळे ते आपल्या हस्तक्षेपाच्या शक्तीचा शहाणपणाने वापर करू इच्छितात. LKP सिक्युरिटीजचे रिसर्च ॲनालिस्ट जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, RBI च्या हलक्या हस्तक्षेपामुळे डेप्रिसिएशन वेगाने झाले आहे.

व्यापार तूट भरून काढण्यासाठी दुर्लक्ष?
काही डीलर्सच्या मते, रुपयाला RBI कडून कमी सपोर्ट मिळत आहे आणि ते कोणत्याही एका विशिष्ट पातळीला वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीत. RBI ने या परिस्थितीत व्यापार तूट (Trade Deficit) भरून काढण्याचा मार्ग शोधला आहे. चलन कमजोर झाल्यास निर्यातदारांना दिलासा मिळतो, ज्यामुळे निर्यात वाढते, तर आयात महाग होतात. 5 डिसेंबरला RBI आपल्या धोरणांची घोषणा (RBI Policy Announcement) करेल, तेव्हा मध्यवर्ती बँक चलनाला स्थिर ठेवण्यासाठी पाऊल उचलते की नाही, हे स्पष्ट होईल. RBI च्या MPC (Monetary Policy Committee) ची बैठक आजपासून 5 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा – Stock Market Update: शेअर बाजारात मोठी उलथापालथ! Sensex 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला

RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचे स्पष्टीकरण
चलन तज्ज्ञ सांगतात की, सेंट्रल बँक आपल्या मॉनेटरी पॉलिसीमध्ये  चलनाच्या घसरणीचा स्वीकार करेल, परंतु कोणत्याही विशिष्ट पातळीवर सिग्नल देण्याचे टाळेल. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा​यांनी वारंवार यावर जोर दिला आहे की, सेंट्रल बँक रुपयाच्या "कोणत्याही विशिष्ट पातळीचे लक्ष्य ठेवत नाही" आणि त्याऐवजी अनैसर्गिक चढ-उतार रोखण्यास प्राधान्य देते. संजय मल्होत्रा ​​यांनी अलीकडेच सांगितले होते की, रुपयाची सध्याची कमजोरी बाजारातील स्वाभाविक हालचालींचा परिणाम आहे आणि सुमारे 3 ते 3.5 टक्क्यांची वार्षिक घसरण दीर्घकालीन ट्रेंड्सनुसार आहे.

रुपया आशियात दुसऱ्या स्थानी
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, 31 डिसेंबर 2024 ते 3 डिसेंबर 2025 या कालावधीत भारतीय रुपयात 5.08 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे इंडोनेशियाई रुपिया (3.17 टक्के घसरण) नंतर रुपया आशियाई चलनात सर्वात खराब कामगिरी करणारी दुसरी करन्सी बनली आहे. फिलिपिन्सचा पेसो (1.54 टक्के) आणि हाँगकाँग डॉलर (0.18 टक्के) हेही कमजोर झाले आहेत. इमर्जिंग मार्केट्समध्ये भारतीय रुपया हा तिसरे सर्वात खराब पातळीवर चालणारे चलन आहे. अर्जेंटिनाच्या पेसोमध्ये (29.18 टक्के) आणि तुर्कीच्या लीरामध्ये (16.69 टक्के) याहून मोठी घसरण झाली आहे.

हेही वाचा – Gold RateToday: सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ! आजचा 10 ग्रॅमचा दर पाहून थक्क व्हाल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version