शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्यी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 23 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 24 वा हफ्ता देखील जमा होणार आहे. सरकारकडून यासंबंधी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
गेल्या महिन्यात पीएम किसान योजनेचा 23 वा हफ्ता 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. मात्र या योजनेचा 24 वा हफ्ता ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तावण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत, सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपये जमा केले जातील.
सरकारी आकडेवारीनुसार, या हप्त्याद्वारे देशभरातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 'डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर' (DBT) द्वारे या योजनेची रक्कम हस्तांतरित केली जात आहे. सरकारने पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 20 जून रोजी जमा केला होता. या हप्त्यात 2 हजार रुपयांचा निधी जमा झाला होता. पीएम किसान योजनेत वर्षाला 6000 रुपयांची मदत केली जाते. तर वर्षाला 3 हप्त्यांमध्ये ती शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.
दरम्यान या योजनेसाठी आधार सीडिंग, जमीनीची कागदपत्रे आणि फेस ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. जर एकाच कुटुंबातले एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेतला आहे अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्यांचे नियम पाळणं गरजेचं आहे. यावेळी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच 24 व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो.