क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! भगवान शंकराच्या संकल्पनेवर आधारित क्रिकेट स्टेडियम, काय आहेत वैशिष्ट्ये?

उत्तरप्रदेशातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे शहर म्हणजे वाराणसी. भारतातील प्रमुख शिवमंदिरांपैकी एक असलेले काशी विश्वनाथ मंदिर, गंगा घाट आणि तिथे होणारी प्रसिद्ध गंगा आरती यामुळे वाराणसी

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! भगवान शंकराच्या संकल्पनेवर आधारित क्रिकेट स्टेडियम, काय आहेत वैशिष्ट्ये?

उत्तरप्रदेशातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे शहर म्हणजे वाराणसी. भारतातील प्रमुख शिवमंदिरांपैकी एक असलेले काशी विश्वनाथ मंदिर, गंगा घाट आणि तिथे होणारी प्रसिद्ध गंगा आरती यामुळे वाराणसी जगभरात चर्चेत आहे. ही आरती पाहण्यासाठी विदेशी पर्यटक खास भारतात येतात. त्याचबरोबर आकर्षक जरीकाम आणि उत्कृष्ट विणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या बनारसी सिल्क साड्यांसाठीही वाराणसी प्रसिद्ध आहे. आता याच यादीत आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे.

वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येत आहे. हे स्टेडियम गंजारी, राजातालाब परिसरात, वाराणसी शहरापासून सुमारे 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण स्टेडियम भगवान शंकराच्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. त्यामुळे भगवान शिवाचे भक्त आणि क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. या स्टेडियममध्ये सुमारे 30,000 प्रेक्षक बसू शकतील, आणि भविष्यात ही क्षमता 40,000 पर्यंत वाढवता येऊ शकते.

काय आहेत या स्टेडियमची वैशिष्ट्ये?

  • त्रिशूळाच्या आकाराचे फ्लडलाइट्स
  • डमरूच्या आकाराचा मीडिया सेंटर
  • अर्धचंद्राच्या आकाराचे रूफ कव्हर्स
  • बेलपत्राच्या आकाराचे मेटल शीट्स
  • काशीच्या घाटांच्या पायऱ्यांपासून प्रेरित प्रेक्षक गॅलरी

हेही वाचा – Sayaji Shinde: लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले सयाजी शिंदे; हिंदी भाषा सक्तीवर परखड भाष्य, म्हणाले…

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील रणजी ट्रॉफीचे सामने वाराणसीमध्ये होण्याची शक्यता आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास, वाराणसीमध्ये आयपीएलचे सामने देखील पाहायला मिळू शकतात. इतकेच नाही तर WPL 2027 वाराणसीमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number