Delhi Airport Flight Fire : दिल्ली विमानतळावर एकच घबराट! टेक ऑफ घेण्यापूर्वीच विमानाला लागली आग; 6 प्रवासी जखमी तर लहान मुलांसह 228 प्रवासी…

दिल्लीहून झुरिचला रवाना होणारे स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सचे LX147 हे विमान टेक ऑफ घेण्यासाठी अवघा काही वेळ बाकी असतानाच भयानक आगीच्या वेळख्यात आले.

Delhi Airport Flight Fire : दिल्ली विमानतळावर एकच घबराट! टेक ऑफ घेण्यापूर्वीच विमानाला लागली आग; 6 प्रवासी जखमी तर लहान मुलांसह 228 प्रवासी…

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. दिल्लीहून झुरिचला रवाना होणारे स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सचे LX147 हे विमान टेक ऑफ घेण्यासाठी अवघा काही वेळ बाकी असतानाच भयानक आगीच्या वेळख्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून झुरिचला रवाना होणारे स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सचे LX147 या विमानाने पहाटे 1.08 वाजता उड्डाण सुरू केल. मात्र टेक ऑफ घेण्यापूर्वीच या विमानाला आग लागली. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा- Railway Fire Incident: चारमिनार एक्सप्रेसला भीषण आग; स्थानकाजवळ प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी पळापळ

या विमानात एकूण 228 प्रवासी प्रवास करत होते. हे विमान टेकऑफच्या प्रक्रियेत असतानाच विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला ज्यामुळे विमानाला आग लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्काळ ‘टेकऑफ’ रोखले आणि इमर्जन्सी ब्रेक लावले. इंजिन निकामी झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. विमानाला आग लागल्याचे समजताच विमानातील प्रवाशांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली.

विमान थांबल्यानंतर सर्व प्रवाशांना ‘इमर्जन्सी स्लाइड’च्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र यावेळी प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्यामुळे 6 प्रवासी जखमी झाले. या जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी विमानतळ प्रशासनाने आणि क्रू मेंबर्सनी परिस्थिती हाताळली. या घटनेनंतर एअरलाईनने विशेष ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली असून इंजिनला आग लागण्याचे नेमके कारण शोधले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number