भारताचा आणखी एक ‘स्ट्राइक’! पाकिस्तानी जहाजांना भारतात नो एन्ट्री

भारतीय नौदलाने आज पाकिस्तानसाठी आपला सागरी क्षेत्र बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. आदेशांनुसार, पाकिस्तानी ध्वज फडकवणाऱ्या कोणत्याही जहाजाला भारतातील कोणत्याही बंदरात प्रवेश दिला जाणार नाही. <br/>
भारताचा आणखी एक ‘स्ट्राइक’! पाकिस्तानी जहाजांना भारतात नो एन्ट्री
Edited Image

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल हाय अलर्ट मोडवर आहेत. भारतीय नौदल अरबी समुद्रात सतर्क आहे आणि युद्धाभ्यास करत आहे. भारतीय नौदलाने आज पाकिस्तानसाठी आपला सागरी क्षेत्र बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.

पाकिस्तानी जहाजांना भारतात नो एन्ट्री – 

आदेशांनुसार, पाकिस्तानी ध्वज फडकवणाऱ्या कोणत्याही जहाजाला भारतातील कोणत्याही बंदरात प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय ध्वज असलेले कोणतेही जहाज पाकिस्तानात बांधलेल्या कोणत्याही बंदरात जाणार नाही. भारत सरकारच्या जहाजबांधणी महासंचालनालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

हेही वाचा –  पाकिस्तानची तारांबळ उडणार! भारताने पाकिस्तानमधून होणारी आयात तात्काळ थांबली

पाकिस्तानमधून होणारी आयात-निर्यातीवर बंदी – 

आज भारताने पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंधही संपुष्टात आणले आहेत. भारताने पाकिस्तानसोबत आयात-निर्यात बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. आदेशात म्हटले आहे की आता पाकिस्तानसोबत कोणताही व्यापार होणार नाही. भारतातून पाकिस्तानला कोणताही माल जाणार नाही आणि पाकिस्तानातून कोणताही माल येणार नाही. 

हेही वाचा – पाकिस्तानची तारांबळ उडणार! भारताने पाकिस्तानमधून होणारी आयात तात्काळ थांबली

शाहबाज शरीफ यांचे एक्स अकाउंटेड ब्लॉक – 

याशिवाय, भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे एक्स हँडल आणि यूट्यूब चॅनल देशात ब्लॉक केले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री आणि माहिती मंत्र्यांचे एक्स अकाउंटही ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version