मराठीसह दक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारे मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मी इकडेच लहानाचा मोठा झालो आहे, मला लालबागच्या राजाच्या दर्शनाला यायला आवडते’ असे म्हणत त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर त्यांना मुंबईतील हिंदी भाषेच्या सक्तीवरून मत विचारले असता त्यांनी, ‘हर एक को अपने माँ की जो भाषा है उसके ऊपर गौर करना चाहिए, माँ की जो भाषा है उसको प्यार करना चाहिए और बाकी सभी भाषाओं का आदर करना चाहिए’, असे उत्तर दिले. त्यांनी कोणत्याही भाषेचा अनादर न करता आपले मत स्पष्टपणे मांडले.
तसेच सयाजी शिंदे यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘मांजर’ येत्या शुक्रवारी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. सर्व प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. त्यांनी चित्रपटाच्या यशाकरिता बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.