Kranti Redkar Post Viral : ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत ट्रोलर्सना सुनावलं

आर्यन खानची वेब सीरिज ' द बॅड्स...' सध्या चर्चेत आहे. यात समीर वानखेडेंची नक्कल केल्याची चर्चा आहे. त्यांना काही लोक ट्रोलही करत आहेत. यावर क्रांती रेडकर यांनी पोस्ट करत ट्रोलर्सना उत्तर दिले आहे.
Kranti Redkar Post Viral : ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत ट्रोलर्सना सुनावलं

मुंबई : शाहरुख खानच्या लेकाची म्हणजेच आर्यन खान याची वेब सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या सीरिजमध्ये आर्यनने बॉलिवूडमधील कलाकारांच्या आयुष्याची आणि उद्योगाच्या काळ्या बाजूची पोलखोल केल्याचे मानले जाते. या वेब सीरिजमधील एक सीन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आर्यनने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची खिल्ली उडवल्याची चर्चा आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमधील एका सीनमध्ये समीर वानखेडे यांच्यासारखा दिसणारा एक अधिकारी एका डीजेला बारच्या बाहेर सिगारेट ओढताना दिसल्यामुळे त्याला थांबवतो. या अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने समीर वानखेडे यांची नक्कल केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आर्यनने समीर यांची मस्करी केली, अशा चर्चांना उधाण आले आहे. अभिनेत्याचा चेहरा आणि लूक समीर यांच्याशी मिळताजुळता आहे.

हेही वाचा – Income Tax on Sonu Sood : कोरोना काळात मदत केली पण…; अभिनेता सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर

क्रांती रेडकरची पोस्ट आणि ट्रोलर्सवर निशाणा
या वादावर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये समीर वानखेडे एका अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमात सहभागी झालेले दिसत आहेत. या कार्यक्रमात ते उपस्थितांना ड्रग्ज किती हानिकारक आहेत, याबद्दल माहिती देत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करताना क्रांतीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अमली पदार्थांचे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याची खिल्ली उडवणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक आहे.”

क्रांतीने केले पतीचे कौतुक
क्रांतीने पुढे म्हटले आहे की, “समाजातील प्रत्येक व्यक्तीने या समस्येचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातील मोठे दुष्परिणाम टाळता येतील. चांगलं काम करत राहा @swankhede.irs, समाजासाठी तुमचं योगदान खूप मोठं आहे आणि आम्हाला सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही आठवड्याचे शेवटचे दिवस मजा करण्यात किंवा सुट्टीत घालवू शकता. पण तुम्ही हा वेळ ड्रग्जविरोधी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यासाठी देता. ही तुमची निवड आहे. आम्ही सर्व तुमच्या आणि तुमच्या चळवळीच्या पाठीशी उभे आहोत.”

हेही वाचा – Asmita Deshmukh: एका इव्हेंटदरम्यान ‘या’ अभिनेत्रीची फसवणूक, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती; नेमकं काय घडलं?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version