Defamation Case : आर्यन खानविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले,…

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांची याचिका फेटाळून लावली. समीर वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले...
Defamation Case : आर्यन खानविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले,…

Defamation Case: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' मालिकेतील काही दृश्यांवरून सुरू झालेल्या वादावर आता माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) अधिकारी आणि सध्याचे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी आपले मौन सोडले आहे. समीर वानखेडे यांनी या मालिकेबद्दलची मानहानीची याचिका न्यायालयात दाखल केली होती. यामध्ये त्यांनी शाहरुख खान, गौरी खान यांच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स विरुद्ध दावा केला होता की, मालिकेमुळे त्यांची प्रतिष्ठा मलिन झाली झाली आहे. तथापि, दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांची याचिका फेटाळून लावली. समीर वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, मी यावर भाष्य करू इच्छित नाही. मी फक्त एक गोष्ट सांगेन: ‘सत्यमेव जयते.’

काय आहे प्रकरण? 

दरम्यान, 2021 मध्ये समीर वानखेडे यांनी आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. आर्यन खान 27 दिवस तुरुंगात राहिला. नंतर तो निर्दोष ठरला. बॅड्स ऑफ बॉलीवूड सिरिजमध्ये अशा एका दृश्याचा समावेश आहे ज्यात एका सेलिब्रिटीला ड्रग्ज घेताना दाखवले आहे. या दृश्यात दाखवलेल्या नार्कोटिक्स अधिकाऱ्याचे व्यक्तीमत्त्व समीर वानखेडेशी जुळत असल्याचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

हेही वाचा – Kapil Sharma Threat Case : कपिल शर्माच्या व्यवस्थापकाला एक कोटी रुपयांच्या खंडणीचा फोन; आरोपी अटकेत

यानंतर वानखेडे यांनी मालिकेविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत दावा केला की, मालिकेत त्यांच्याबाबत खोटे आणि बदनामीकारक चित्रण केले आहे. त्यांनी मानहानी प्रकरणी 2 कोटी रुपयांची भरपाई मागितली. तथापी, ही रक्कम त्यांनी कर्करोग रुग्णांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला देण्याची तयारी दर्शविली होती.

हेही वाचा – Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टात मोठा धक्का! आर्यन खानच्या वेब सीरिजविरोधात मानहानी प्रकरणाची सुनावणी.. कोर्ट म्हणाले,

न्यायालयाचा निर्णय

तथापी, दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांची  याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने स्पष्ट केले की, जर वानखेडे यांना हे सिद्ध करता आले असते की त्यांची सर्वाधिक बदनामी दिल्लीत झाली आहे, तर या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत होऊ शकली असती. दरम्यान, आर्यन खानच्या मालिकेवरील हा वाद आता न्यायालयीन निकालानंतर थोडा शांत झाला आहे. तथापी, समीर वानखेडे यांनीही तटस्थ भूमिका घेतली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version