जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेता स्वप्नील जोशींनी दिली भेट

1 मे 2025 रोजी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 12 वा वर्धापनदिन संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कार्यालयात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी दाखल झाले होते.

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेता स्वप्नील जोशींनी दिली भेट

मुंबई: 1 मे 2025 रोजी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 12 वा वर्धापनदिन संपन्न झाला. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता 13 व्या वर्षांत पदार्पण करतेय. या पार्श्वभूमीवर, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कार्यालयात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी दाखल झाले होते. या दरम्यान, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांनी अभिनेता स्वप्नील जोशी यांच्यासोबत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कामकाज आणि त्याच्या ध्येयाविषयी महत्वाची चर्चा केली. 

हेही वाचा: Maharashtra Din 2025: राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरी

यावेळी, स्वप्नील जोशी यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर, संपादक आशुतोष पाटील यांनी अभिनेता स्वप्नील जोशींना, 'आज एक बुलेटिन तुम्हाला लावायचं आहे', असं म्हणाले. त्यानंतर, मुंबईचे ब्युरो प्रमुख पंकज दळवी यांनी अभिनेता स्वप्नील जोशी यांना आजच्या ठळक बातम्या सांगितल्या. या दरम्यान, स्वप्नील जोशींनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत म्हणाले की, 'मला हा मान दिल्याबद्दल धन्यवाद. खूप छान वाटत आहे, आज तुम्हा सर्वांना पारंपरिक वेशभूषांमध्ये पाहून खूप छान वाटलं'. त्यानांतर, अभिनेता स्वप्नील जोशींनी पाहुणा संपादकाच्या भूमिकेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट सोबत संवाद साधत बातम्या कशापद्धतीने न्यूजरूममध्ये येते आणि त्यासोबतच, त्या बातम्या कशाप्रकारे चालवल्या जातात, याचा आढावा  घेतला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number