अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टमधील एका फोटोने लाखो चाहत्यांचे लक्ष वेधले असून अनेकांनी अभिनेत्रीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र, स्वत: कोंकणानेच आपल्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
प्रकृती बिघडली अन् थेट रुग्णालय गाठलं
कोंकणा सेन शर्मा या अभिनेत्रीने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केलेला आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री रुग्णालयातील बेडवर बसलेली दिसत आहे. विशेष म्हणजे, या कठीण परिस्थितीमध्ये देखील कोंकणा ही कॅमेऱ्यासमोर सॅल्यूट करताना दिसून येत आहे. तिच्या या फोटोसोबतच असलेल्या एका वाक्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला.
तब्येतीबाबत दिलं महत्त्वाचं अपडेट
कोंकणाने सांगितले की, तिला डेंग्यूची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता तिची तब्येत ही आधीपेक्षा सुधारली असून आता ती रिकव्हरी करत आहे. यासोबतच तिने चाहत्यांना आणि सर्वसमान्यांना ही डेंग्यूपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला आहे. 'डेंग्यूपासून सावध राहा. मी हॉस्पिटलमध्ये होते, पण आता मला काहीसे बरे वाटत आहे', असे सांगत तिने आपल्या इंस्टाग्रा स्टोरीवर शेअर केला, त्यामुळेच तिच्या चाहत्यांनीही अभिनेत्रीच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्या दिलेल्या आहेत.
https://www.instagram.com/p/DdhFJOgzSqT/?utm_source=ig_embed&ig_rid=Aage0g6RUuGEDBDjZ-Pee8f
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.