Nagpur News : हृदयद्रावक घटना! आईसोबत विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ व्यक्त

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी देवी हरतालिका (गौरी) यांच्या मूर्तींचे विसर्जन करताना दोन 13 वर्षीय मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत मुलांची ओळख आयुष हरीश कुमरे आणि दर्शन धनराज लाड अशी पटली आहे. ते दोघेही पूर्व महाराष्ट्रातील काटोल तालुक्यातील झिल्पा गावचे रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील महिला देवी हरतालिका किंवा […]

Nagpur News : हृदयद्रावक घटना! आईसोबत विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ व्यक्त

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी देवी हरतालिका (गौरी) यांच्या मूर्तींचे विसर्जन करताना दोन 13 वर्षीय मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत मुलांची ओळख आयुष हरीश कुमरे आणि दर्शन धनराज लाड अशी पटली आहे. ते दोघेही पूर्व महाराष्ट्रातील काटोल तालुक्यातील झिल्पा गावचे रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील महिला देवी हरतालिका किंवा पार्वती यांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी सकाळी 11 च्या सुमारास तलावावर गेल्या होत्या. यावेळी अनेक मुलेही पाण्यात उतरली होती. “विसर्जन सोहळा सुरू असतानाच, आयुष आणि दर्शन हे दोन मुलगे बेपत्ता असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने आरडाओरडा करून मदत मागण्यात आली आणि त्यांच्या काकांनी तलावात उतरून त्यांचा शोध घेतला,” असे पोलिसांनी सांगितले. त्या दोन मुलांना पाण्यातून बाहेर काढून काटोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले, असेही पोलिसांनी नमूद केले.

हेही वाचा : Nashik Crime : धक्कादायक घटना! दारूसाठी पैसे देण्यास आईचा नकार; मद्यपी मुलाने रागातून आईवरचं केले कुऱ्हाडीने वार

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number