नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने एकामागोमाग 6 ते 7 वाहनांना जोरदार धडक दिल्याने महामार्गावर एकच गोंधळ उडाला. या साखळी अपघातात ट्रक, कारसह इतर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला असून 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस, टोल नाक्याचे कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना वाहनांतून बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवले तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.