Crime News : तिला फिरायला घेऊन जात रचला अपघाताचा बनाव; आरोपी वडिल अन् भावाला महिनाभरानंतर अटक; ‘त्या’ व्हिडिओने उघडलं रहस्य

काही दिवसांपूर्वी अपघातात आपली 22 वर्षीय तरुण मुलगी गमावली. मात्र, काही दिवसांनंतर आलेल्या सत्याने सर्वांच्या पायाखालची जमिन सरकली. या प्रकरणी पोलिसांनी भाऊ हाबिल फारुक आणि वडिल मोहम्मद नवाबखान यांच्

Crime News : तिला फिरायला घेऊन जात रचला अपघाताचा बनाव; आरोपी वडिल अन् भावाला महिनाभरानंतर अटक; ‘त्या’ व्हिडिओने उघडलं रहस्य

काही दिवसांपूर्वी अपघातात आपली 22 वर्षीय तरुण मुलगी  गमावली. मात्र, काही दिवसांनंतर आलेल्या सत्याने सर्वांच्या पायाखालची जमिन सरकली. या प्रकरणी पोलिसांनी भाऊ हाबिल फारुक आणि वडिल मोहम्मद नवाबखान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नेमकं तरुणीसोबत काय घडलं आणि पोलिसांनी अतिशय जवळील व्यक्तींना का अटक केली?, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,  12 ऑगस्ट रोजी सोफीयाच्या वडिलांनी आणि भावाने तिला घेऊन अचानक फिरायला जाण्याचा प्लॅन केला. ठरलेल्या नियोजनानुसार सोफियाचे वडील, मोहमंद फारूक, आणि तिचा 38 वर्षीय भाऊ, मोहमंद हबील, तिला फिरायला घेऊन गेले. वाटेतच हबीलने एका निर्जन रस्त्याच्या कडेला आपली गाडी नेली आणि त्याच ठिकाणी आपल्या बहिणीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले.  मात्र, आपले हे कृत्य लपवण्यासाठी सोफीयाच्या वडिलांनी आणि भावाने तिचा मृतदेह परत मुख्य रस्त्यावर आणला आणि त्यांच्या वाहनाला मागून एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली, असा बनाव केला. याच धडकेमुळे त्याच्या बहिणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  सोफीयाची वडिलांनी-भावानी हत्या केली. पण घडलेला प्रकार अपघात वाटावा म्हणून, तिला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. जिथे दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 हेही वाचा- Pune : पुण्यात MPSC ची तयारी करत होता,हळूहळू तिच्यासोबत कॉलवर बोलण सुरु झालं अन् तिथचं घात झाला ; मध्यरात्रीच तरुणासोबत..; महाराष्ट्र हादरला

त्या' व्हिडिओने उघडलं रहस्य
पोलिसांनी सोफीयाच्या मृत्यूनंतर तपास सुरु ठेवला. तपासात पोलिसांना साधारण तीन महिन्यांपूर्वीचा एक व्हायरल व्हिडिओ मिळाला, जो तिच्या एका मित्रासोबतचा असून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  हा व्हिडिओ तिच्या भावाने आणि वडिलांनी पाहिल्यापासून तिच्या बाबतचा मनात मोठ्या प्रमाणात राग होता. समाजात अपमानाच्या भीतीने, कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी अखेर घरातील तरुणीलाच ठार मारण्याचा कट रचला केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number