Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेपूर्वी शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ 5 राशींच्या नशिबात पडणार लख्ख प्रकाश, येणार सोन्याचे दिवस

अक्षय्य तृतीयेच्या अवघ्या दोन दिवस आधी होणारा हा बदल काही राशींसाठी 'राजयोग' घेऊन येणार असल्याचे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे.
Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेपूर्वी शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ 5 राशींच्या नशिबात पडणार लख्ख प्रकाश, येणार सोन्याचे दिवस

Shani Nakshtra Parivartan 2026 : यंदा 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा मोठा सण साजरा होणार आहे. मात्र, त्याआधीच ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडणार आहे. न्यायदेवता मानले जाणारे शनिदेव 17 एप्रिल रोजी आपल्या नक्षत्रात बदलून 'उत्तराभाद्रपद' नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. 17 मे पर्यंत ते याच नक्षत्रात विराजमान राहतील. अक्षय्य तृतीयेच्या अवघ्या दोन दिवस आधी होणारा हा बदल काही राशींसाठी 'राजयोग' घेऊन येणार असल्याचे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे. शनीच्या या चालीमुळे अनेक राशींच्या जीवनातील संकटे दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत.

नक्षत्र परिवर्तनाचा 'या' राशींना होणार मोठा लाभ
शनीचे हे नक्षत्र परिवर्तन विशेषतः 5 राशींच्या लोकांसाठी भाग्योदयाचे ठरणार आहे:
– वृषभ (Taurus) : या राशीच्या लोकांसाठी शनीची ही चाल सकारात्मकतेचे संकेत देत आहे. करिअरमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्यासोबतच तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

– मिथुन (Gemini) : तुमच्यासाठी हा काळ यश आणि संतुलनाचा असेल. व्यवसायात भागीदारीतून मोठा लाभ होईल आणि नवीन करारांवर स्वाक्षरी होऊ शकते. नातेसंबंधांमधील दुरावा कमी होऊन कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

– सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. बराच काळ रखडलेली कामे आता मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे चांगले योग असून समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

हेही वाचा – Akshaya Tritiya 2026 : सोने खरेदीसाठी 19 तासांचा सुवर्णयोग! पंचांगानुसार जाणून घ्या शुभ वेळ आणि मुहूर्त

– कन्या (Virgo) : मानसिक तणावातून तुमची सुटका होणार आहे. हे परिवर्तन तुमच्यासाठी मोठा दिलासा घेऊन येईल. वायफळ खर्च कमी होतील आणि आर्थिक नियोजनामुळे तुमची बचत वाढेल.

– धनु (Saggitarius) : करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची हीच वेळ आहे. नोकरीत बढती किंवा नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायानिमित्त केलेल्या प्रवासातून आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत.

शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी प्रभावी उपाय
शनीचा प्रभाव सकारात्मक करण्यासाठी आणि साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत फलदायी ठरते. तसेच, काळे तीळ आणि तेलाचे दान केल्याने शनीचे दोष कमी होतात. शनिदेवांना हनुमंतरायांची भक्ती प्रिय असल्याने मारुतीची पूजा आणि उपासना करावी. याव्यतिरिक्त, शनि मंत्रांचा जप करणे, कावळ्यांना अन्न देणे आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या कर्मात सुधारणा करून गरजूंची मदत करणे, हे उपाय शनिदेवाला प्रसन्न करण्यास मदत करतात.

हेही वाचा – Akshaya Tritiya 2026 Date: अक्षय तृतीया कधी आहे? तारखेबाबतचा संभ्रम दूर; जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि संपूर्ण माहिती 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version