Tribal Ashram School: शहापूरच्या आदिवासी आश्रमशाळेत खळबळ! 21 विद्यार्थिनींचा विनयभंग; कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे.

Tribal Ashram School: शहापूरच्या आदिवासी आश्रमशाळेत खळबळ! 21 विद्यार्थिनींचा विनयभंग; कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. टेंभा गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप एका कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 21 विद्यार्थिनी बाधित झाल्याची माहिती समोर आल्याने आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणी शहापूर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 354 तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गणपत गवळी असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आश्रमशाळेत स्वयंपाक्याचा मदतनीस म्हणून काम करत होता. आश्रमशाळेतील दैनंदिन कामकाजाच्या निमित्ताने विद्यार्थिनींची त्याच्याशी अनेकदा भेट होत होती. याच संपर्काचा गैरफायदा घेत तो विद्यार्थिनींना त्रास देत असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Palghar Crime : आधी प्रियकरासोबत फिरायला गेली, दोन दिवसांनी मृत्यू; पालघरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय झालं?

घटनेतील एका विद्यार्थिनीने धाडस करून आपल्यासोबत घडलेला प्रकार आश्रमशाळेच्या अधीक्षकांना सांगितला. त्यानंतर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. अधीक्षक आणि संबंधित विद्यार्थिनी शहापूर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत तपासाला सुरुवात केली.

या प्रकरणात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला एकटी गाठून आरोपीने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही समोर आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वीही काही विद्यार्थिनींसोबत अशाच प्रकारचे गैरवर्तन झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पद्धतीने केला जात आहे.

टेंभा येथील आश्रमशाळेच्या इमारतीत मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आहे. मुलींच्या वसतिगृहाचा भाग वरच्या मजल्यावर असून दैनंदिन कामांसाठी विद्यार्थिनींना इमारतीत खाली-वर जावे लागते. याच काळात आरोपी विद्यार्थिनींच्या संपर्कात येत असल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा: Farmers Protest : सरकार आंदोलन दडपतयं? महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या; शेतकरी संघटनेच्या राजीव कसबेंसह शेकडो शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी पद्धतीने शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक यंत्रणा कितपत प्रभावीपणे कार्यरत आहे, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास सुरू आहे. किती विद्यार्थिनींनी तक्रारी केल्या, आरोपीकडून नेमक्या कोणत्या प्रकारचे गैरवर्तन करण्यात आले आणि यापूर्वी अशा घटना घडल्या होत्या का, याचा तपास केला जात आहे. विद्यार्थिनींच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number