Ayodhya Ram Temple Security Breach: अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिर संकुलात सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत संवेदनशील घटना समोर आली आहे. शनिवारी एका 50 वर्षीय व्यक्तीने मंदिर परिसरात नमाज अदा करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंदिर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दलांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, सध्या विविध सुरक्षा यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने राम मंदिर संकुलाच्या गेट क्रमांक 1 मधून प्रवेश मिळवला होता. दुपारी संकुलाच्या दक्षिण दिशेला असलेल्या तटबंदीजवळ हा तरुण नमाज पठण करताना काही भाविकांच्या नजरेस पडला. उपस्थित लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने प्रतिकार करत धार्मिक घोषणा देण्यास सुरुवात केली. या गोंधळामुळे मंदिर परिसरात घबराट पसरली होती. आरडाओरडा ऐकून सुरक्षा दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
हेही वाचा – 'स्वतःच्या कामावर लक्ष द्या'; उमर खालिदला पत्र पाठवणाऱ्या जोहरान ममदानीला भारताने सुनावले खडे बोल
आरोपीची ओळख आणि तपास
प्राथमिक चौकशीत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव अहमद शेख असे असल्याचे समोर आले असून, तो जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील शोपियान जिल्ह्याचा रहिवासी आहे. या घटनेनंतर अयोध्येत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, शहरातील काश्मिरी शाल विक्रेत्यांचीही चौकशी केली जात आहे. संशयित म्हणून काहींना ताब्यात घेतल्याचे समजते.
अहमद शेख याने इतक्या कडक सुरक्षेतून आत प्रवेश कसा मिळवला आणि यामागे काही कट होता का? याचा तपास गुप्तचर यंत्रणा करत आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकरणावर राम मंदिर ट्रस्ट किंवा जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे राम मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून परिसरात पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.