Pune Pimpri-Chinchwad Liquor Case: पुणे पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरण! मृतांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत?

काल पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये फुगेवाडी आणि हडपसर परिसरात मिथेनॉलमिश्रित विषारी हातभट्टी दारू पिऊन 19 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान मृत्यू झालेल्यांना एक लाख रुपयांची मदत जाहीर झाल्याची बातमी समोर आली आहे.

Pune Pimpri-Chinchwad Liquor Case: पुणे पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरण! मृतांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत?

काल पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये फुगेवाडी आणि हडपसर परिसरात मिथेनॉलमिश्रित विषारी हातभट्टी दारू पिऊन 19 जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. यादरम्यान आता पिंपरी- चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे गावठी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आली असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाकडून देखील मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यात यावी अस आवाहन केल आहे. या प्रकरणानंतर शहरातील गावठी दारू बनवणाऱ्यांविरोधात तक्रार दिल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तर फुगेवाडी परिसरात मागील 40 वर्षापासून अवैध दारू विक्री व्यवसाय सुरू होता. वारंवार याची माहिती स्थानिक नागरिक पोलीस विभागाला देत होते तरीसुद्धा कारवाई का झाली नाही असा संतप्त सवाल विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.  

हेही वाचा- Pune Pimpri-Chinchwad Liquor Case: पुणे पिपंरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणातील निष्काळजीपणा पोलिसांना भोवलं; 9 पोलिसांच्या निलंबनासह बदलीची कारवाई
13 पोलिसांच्या निलंबनासह बदलीची कारवाई
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली असून दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखा याच्यासह एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर हडपसर येथील विषारी दारुकांड वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला भोवलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात देखील मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

विषारी दारू मृत्यूप्रकरणी तीन निरीक्षक, सहा दुय्यम निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यावेळी एकूण 13 जणांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस आयुक्त अभितोष कुमार आणि विनय कुमार चोबे यांनी देखील कारवाई करत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, तपास पथकाचे प्रमुख, चौकी प्रभारी आणि कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

तसेच हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्यासह पोलिस निरीक्षक हसीना सिकलगार, उपनिरीक्षक हसन मुलानी यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याचसोबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केलेल्या कठोर कारवाई अंतर्गत दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसेच तपास पथकाचे इंचार्ज आणि 4 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची पोलीस नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. कर्तव्यास कसुरी केल्याचा ठपका ठेवत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number