Nagpur Crime: मित्रासोबत वाद, पोलिसांत तक्रार अन् अचानक बेपत्ता; कन्हान नदीत सापडला महिलेचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

नागपुरातील अश्विनी उर्फ आशी डे यांचा मृतदेह कन्हान नदीपात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या, अपघात की घातपात, याचा तपास सुरू असून मोबाईलचा शोध आणि तांत्रिक तपासावर पोलिसांचा भर आहे.

Nagpur Crime: मित्रासोबत वाद, पोलिसांत तक्रार अन् अचानक बेपत्ता; कन्हान नदीत सापडला महिलेचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले असून मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेची ओळख अश्विनी उर्फ आशी डे अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Crime News : प्रेयसीच्या लेकीचा विनयभंग करणं नराधम प्रियकराला पडलं महागात; संतप्त आईने गुप्तांग कापलं अन्…

या प्रकरणात आत्महत्या, अपघाती मृत्यू किंवा घातपात अशा सर्व शक्यतांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अद्याप कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नसून तपासाच्या विविध अंगांनी चौकशी केली जात आहे.

दरम्यान, मृत महिलेचा कन्हान परिसरातील एका पुरुष मित्रासोबत काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या वादासंदर्भात तिने यापूर्वी पोलिसांकडे तक्रारही केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तपासादरम्यान या प्रकरणाचाही बारकाईने अभ्यास केला जात आहे.

हेही वाचा: Menstrual Cup Drug Smuggling : संतापजनक! पीरियड्स कपचा वापर करून ड्रग्जची तस्करी; महिला तस्कर जेरबंद

याशिवाय, काही माध्यमांमध्ये अश्विनी उर्फ आशी डे ही अमली पदार्थांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये पोलिसांना माहिती पुरवणारी खबरी म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्याला अद्याप पोलिसांकडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा चर्चांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number