Nagpur Crime: दारूसाठी पैसे मागितले, आईने नकार देताच मुलाचा संताप अनावर; चाकूने आईवर…; नागपुरात खळबळ

नागपूर: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या 66 वर्षीय आईवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मात्र, शिवभोजन केंद्रातील महिला कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सचिन टाकलीकर याला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले […]

Nagpur Crime: दारूसाठी पैसे मागितले, आईने नकार देताच मुलाचा संताप अनावर; चाकूने आईवर…; नागपुरात खळबळ
Nagpur Crime

नागपूर: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या 66 वर्षीय आईवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मात्र, शिवभोजन केंद्रातील महिला कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सचिन टाकलीकर याला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.

ही घटना जागनाथ बुधवारी परिसरातील कुंभारपुरा येथील शिवभोजन केंद्रात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन टाकलीकर हा आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढताच आरोपीने आईला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

Crime News : माती भरलेल्या डंपरने चिरडलं; रस्त्यावर 50 मीटर फरफटवलं; बेकायदेशीर उत्खनन रोखणाऱ्या वन अधिकाऱ्याचा धक्कादायक शेवट

यानंतर संतापाच्या भरात सचिनने जवळील चाकू काढून आईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी शिवभोजन केंद्रात उपस्थित असलेल्या महिला कर्मचारी ललिता निमजे यांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत आरोपीच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि उपस्थित नागरिकांमध्येही सुटकेचा श्वास सोडला गेला.

घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू असून, घटनेतील सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. सचिन टाकलीकर याच्यावर यापूर्वी सात गुन्हे दाखल असून त्याने विविध प्रकरणांमध्ये एकूण १६ वर्षांची शिक्षा भोगली आहे. विशेष म्हणजे, हत्या प्रकरणातील शिक्षा पूर्ण करून तो गेल्याच वर्षी कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाल्याची चर्चा परिसरात आहे.

Bhiwandi Auto Rickshaw Viral: विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! एका रिक्षातून 17 विद्यार्थ्यांचा कोंबून प्रवास

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी ललिता निमजे यांच्या धाडसाचे कौतुक करत अशा प्रसंगात दाखवलेल्या त्यांच्या तत्परतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचल्याची भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या पुढील कोठडीबाबत न्यायालय निर्णय देणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number