Mumbai Accident: मालाडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारची तब्बल 20 जणांना धडक, भाजप आमदाराच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात घडला.

Mumbai Accident: मालाडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारची तब्बल 20 जणांना धडक, भाजप आमदाराच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात घडला. एस.व्ही. रोडवरील मामलेदार वाडी जंक्शन येथे भरधाव कारने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत महिला वकील प्रियांका सतरा यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले असून त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

मृत प्रियांका सतरा या भाजपाचे नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या चुलत बहिण असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Crime News : पार्टीत चिकनचे पीस जास्त खाण्यावरून वाद… आरोपीने मित्राला चाकू भोसकून संपवलं

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एमजी विन्सर कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने सलग तीन रिक्षा आणि एका दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर अनेक प्रवासी आणि रस्त्यावरून जाणारे नागरिक जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापत झालेल्या प्रियांका सतरा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा: Phaltan Doctor News : फलटणमधील आणखी एका डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल! सायन स्टेशनवरच घडला धक्कादायक प्रकार 29 ऑगस्टला इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे..

पोलिसांनी कार चालक कृष्णा शांताराम चमनकर (वय 70) याला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. दरम्यान, चालकाचा वेग, वाहनावरील नियंत्रण आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number