मुंबईतील डबेवाल्यांचा मोठा आधार जनतेला मिळतो. मात्र आता काही दिवस ही सेवा बंद राहणार आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनकडून 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत डबे वितरण सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सेवेचा जे लाभ घेत आहेत. त्यांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.
मुंबई डबेवाला असोसिएशनकडून 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत डबे वितरण सेवा पूर्णपणे बंद असल्याचे सांगितले आहे. ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त दरवर्षी घेतली जाणारी ही सुट्टी असल्याचं असोसिएशननं सांगितलं आहे. अनेक वर्षांपासून अखंडपणे सेवा देणारे डबेवाले या काळात गावी जाऊन धार्मिक विधी आणि पारंपरिक उत्सवांमध्ये सहभागी होतात.
यामुळे लाखो नोकरदारांना पर्यायी जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे. या काळात सेवा बंद असली तरी ग्राहकांनी डबेवाल्यांचा पगार कापू नये, अशी विनंती सोसिएशनकडून करण्यात आली आहे.डबे सेवा बंद असल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बाहेरून जेवण मागवणं किंवा घरून वेगळी व्यवस्था करणं आवश्यक ठरणार आहे. अचानक अडचण येऊ नये म्हणून आधीच नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.