Journalist Suspicious Death : दहा दिवसांनी होणार होतं लग्न अन् न्यूजरूममध्ये संशयास्पद स्थितीत आढळला महिला अँकरचा मृतदेह

आसाममधील एका प्रसिद्ध महिला पत्रकाराचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लग्नाला केवळ 10 दिवस उरलेले असताना असा मृत्यू चटका लावून जाणारा आहे.
Journalist Suspicious Death : दहा दिवसांनी होणार होतं लग्न अन् न्यूजरूममध्ये संशयास्पद स्थितीत आढळला महिला अँकरचा मृतदेह

Journalist Ritumony Roy Suspicious Death : आसाममधील एक प्रसिद्ध महिला पत्रकार (Assam Woman Journalist) रितुमोनी रॉय (Ritumoni Roy) यांचा मृतदेह न्यूजरूममध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी 24 नोव्हेंबरला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, अवघ्या 10 दिवसांनी, म्हणजेच 5 डिसेंबर रोजी रितुमोनी रॉय यांचा विवाह (Ritumoni Roy Marriage) देबाशीष बोरा (Debashish Bora) यांच्याशी होणार होता.

आनंदात दिसत होती, पण…
मृत्यूच्या एक दिवस आधी, 23 रोजी रविवारी, रितुमोनी एका मैत्रिणीच्या घरी 'प्री-वेडिंग सेलिब्रेशन'साठी (Pre-Wedding Celebration) पोहोचली होती. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी ती खूप आनंदी दिसत होती आणि लग्नाचे फोटो शेअर करत होती. लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून झाली होती आणि सगळी तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, त्याच संध्याकाळी ती ऑफिसला गेली आणि त्यानंतर घरी परतलीच नाही.

न्यूजरूममध्ये संशयास्पद मृत्यू
रितुमोनी गुवाहाटीत कुटुंबापासून वेगळी राहत होती. ती 'सच द रियलिटी' (Sach The Reality) या डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये अँकर आणि रिपोर्टर म्हणून कार्यरत होती. यापूर्वी तिने 'प्रथम खबर', 'ईशान न्यूज' आणि इतर अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम केले होते.

हेही वाचा – Women Held on Airport : चीनकडून अपमानास्पद वागणूक; पासपोर्टवरील 'अरुणाचल प्रदेश' नाव पाहताच भारतीय महिलेला 18 तास थांबवून ठेवले

रात्रभर तिचा होणारा नवरा देबाशीष यांनी तिला वारंवार फोन केला, पण तिने फोन उचलला नाही. दुसऱ्या दिवशी सोमवारी, 24 नोव्हेंबर रोजी, सकाळी ते स्वतः ऑफिसला पोहोचले. तेव्हा आतून दरवाजा बंद होता. दरवाजा जबरदस्तीने उघडण्यात आला, तेव्हा रितुमोनी छताच्या पंख्याला शालीने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली.

सुसाइड नोट सापडली (Suicide Note) 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. पोलिसांनी प्राथमिक तपासात आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून एक सुसाइड नोट मिळाली आहे, ज्यामध्ये लिहिले होते, 'हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. क्षमा करा.' या नोटमधील हस्ताक्षराची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक टीमने ती लॅबमध्ये पाठवली आहे.

हेही वाचा – Gorakhpur Shocker: घोर कलियुग! 'आईचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवा…', वृध्दाश्रमला मुलाचं धक्कादायक उत्तर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version