वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात घेतले सात फेरे; अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात सप्तपदी पूर्ण केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ब्लॅकआउट लागू केले असताना गुरुवारी रात्री हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.
वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात घेतले सात फेरे; अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
Edited Image

जोधपूर: सध्या सोशल मीडियावर जोधपूरमधील एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिथे वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात सप्तपदी पूर्ण केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ब्लॅकआउट लागू केले असताना गुरुवारी रात्री हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटीझन्स तो लाईक करत आहेत. 7 मे रोजी भारतात अनेक ठिकाणी ब्लॅकआउट प्रॅक्टिस करण्यात आली. यावेळी, काही काळासाठी सर्व ठिकाणी वीज खंडित झाली.

ब्लॅकआउट दरम्यान पार पडला लग्न सोहळा – 

प्राप्त माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीचा ब्लॅकआउट लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर, लोकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ब्लॅकआउटला पाठिंबा दिला आणि त्याचे पालन केले. ब्लॅकआउट दरम्यान पार पडलेल्या या लग्नाचे सर्वजण कौतुक करत असून वधू-वरांचे अभिनंदन करत आहेत.

हेही वाचा – भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचा थरकाप! लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पदावरून हटवले?

जोधपूर ब्लॅकआउट – 

वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने जोधपूर शहरत अंधारात बुडाले होते.  युद्धादरम्यान उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा सराव करण्यासाठी हे ब्लॅकआउट करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, लोकांना परिस्थितीचा सामना करण्यास मदत करण्यासाठी हे ब्लॅकआउट राबवण्यात आले होते.

हेही वाचा – INS विक्रांतने मोडले पाकिस्तानचे कंबरडे! कराचीसह अनेक शहरांमध्ये हल्ले

दरम्यान, लग्न समारंभाच्या वेळी लगीन घरात सनई-चौघड्यांचा आवाज ऐकायला येत होता. परंतु, अचानक सायरनचा आवाज ऐकून वराने संपूर्ण कार्यक्रम थांबवला. यासोबतच घरातील सर्व दिवेही बंद करण्यात आले. लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी त्याचे कौतुक केले आणि वराने एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडल्याचे सांगितले.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version