Ayushi Sharma Case : पोटच्या मुलीनेच सुपारी देऊन आईला संपवलं! कट रचून वडिलांनाही जगाचा निरोप घेण्यास भाग पाडल्याचा नातेावईकांचा संशय

वरकरणी हा निव्वळ रस्ते अपघात वाटत असला, तरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना घातपाताचा संशय आला.
Ayushi Sharma Case : पोटच्या मुलीनेच सुपारी देऊन आईला संपवलं! कट रचून वडिलांनाही जगाचा निरोप घेण्यास भाग पाडल्याचा नातेावईकांचा संशय

Jaipur Ayushi Sharma Crime Case : जयपूरमध्ये घडलेल्या नीरज शर्मा (वय 45) यांच्या हत्येच्या तपासात आता अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. न्यायालयात कनिष्ठ लिपिक असलेल्या नीरज शर्मा या आपल्या मुलाला कोचिंग क्लासमधून सोडून घरी परतत असताना, सुमारे 130 किमी प्रतितास वेगाने आलेल्या एका स्कॉर्पिओ कारने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्या तब्बल 100 फूट दूर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. वरकरणी हा निव्वळ रस्ते अपघात वाटत असला, तरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना घातपाताचा संशय आला. सखोल तपासाअंती समोर आले की, नीरज शर्मा यांच्या 23 वर्षीय मुलगी आयुषी शर्मा हिनेच कौटुंबिक मालमत्ता आणि अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपल्या आईच्या हत्येची 7 लाख रुपयांची सुपारी दिली होती. या कटामध्ये तिचा चुलत भाऊ बलराम उर्फ रवी आणि काका मोहन स्वरूप यांचाही सहभाग होता.

मामाचा गंभीर आरोप; वर्षभरापूर्वी वडिलांचाही संशयास्पद मृत्यू
आई नीरज शर्मा यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आयुषी शर्मासह 7 जणांना अटक केली आहे, तर तिचा चुलत भाऊ बलराम सध्या फरार आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता एक नवीन आणि गंभीर वळण मिळाले आहे. आयुषीचे मामा राकेश शर्मा यांनी पोलिसांत आणि न्यायालयात धाव घेत, आयुषीने तिचे वडील विजय शर्मा यांचीही 2025 मध्ये अशाच प्रकारे हत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. राजस्थान उच्च न्यायालयात लिपिक असलेले विजय शर्मा यांना 2024 मध्ये ब्रेन हॅम्रेज झाले होते आणि ते बरे होत होते. मात्र, आयुषीने त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळण्यापासून रोखले आणि त्यांच्या आजारपणाचा सर्व तपशील कुटुंबापासून लपवून ठेवला, असा आरोप तिच्या मामाने केला आहे.

फीडिंग ट्यूब काढून वडिलांना मारल्याचा संशय
राकेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आयुषीने तिच्या वडिलांना एका अज्ञात ठिकाणी लपवून ठेवले होते. कुटुंबाने जेव्हा त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल विचारणा केली, तेव्हा तिने ते जयपूरच्या 'निविक' रुग्णालयात असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी तिथे जाऊन चौकशी केली असता, विजय शर्मा यांचे 90 टक्के शरीर प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर अत्यंत गंभीर अवस्थेत असताना आयुषी त्यांना घरी घेऊन आली, जिथे त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच आयुषीने त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अर्ज केला आणि घरातील सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी तगादा लावला होता.

हेही वाचा – Nashik Crime : "तर मी तुला आज संपवूनच टाकतो" लग्नाला अवघे दोन महिने अन् पत्नीवर जीवघेणा हल्ला; धक्कादायक कारण समोर

'जसे वडिलांना मारले तसेच तुलाही मारीन!' आईला दिली होती धमकी
मालमत्तेच्या हस्तांतरावरून घरात नेहमीच भांडणे होत असत. अशाच एका वादादरम्यान आयुषीने स्वतःच्या आईला अत्यंत क्रूरपणे धमकी दिली होती, अशी साक्ष मामा राकेश शर्मा यांनी दिली आहे. 'वडिलांची फीडिंग ट्यूब काढून त्यांना ज्याप्रमाणे मी संपवले, अगदी त्याच प्रकारे तुलाही मारून टाकीन; ते माझ्यासाठी खूप सोपे आहे,' असे शब्द आयुषीने तिच्या आईला सुनावले होते. यावरूनच आयुषीने सरकारी नोकरी मिळवण्याच्या अंधाधुंद हव्यासापोटी एकापाठोपाठ एक अशा दोन्ही पालकांचा काटा काढल्याचा दाट संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून पोलीस आता या दिशेने कसून तपास करत आहेत.

थार गाडी अपयशी ठरली म्हणून स्कॉर्पिओने केला हल्ला
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आई नीरज शर्मा यांना संपवण्यासाठी आयुषी आणि तिच्या साथीदारांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा नावाच्या मारेकऱ्याला 7 लाख रुपयांची सुपारी दिली होती. आरोपींनी सुरुवातीला भाड्याने घेतलेल्या 'थार' गाडीतून नीरज शर्मा यांच्या हालचालींवर पाळत ठेवून (रेकी) त्यांना उडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न फसला. त्यानंतर सलग महिनाभर पाळत ठेवल्यानंतर, अखेर 3 जुलै रोजी भरधाव स्कॉर्पिओ कारने नीरज शर्मा यांना चिरडून अपघाताचा बनाव रचण्यात आला, ज्याचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे.

हेही वाचा – Police Encounter : मध्यरात्री भीषण गोळीबार! 60 हून अधिक गोळ्या झाडल्या; खंडणीसाठी आलेल्या शार्पशूटर्सपैकी चौघांचा खात्मा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version