Telangana Shocker: ‘मी तिच्यावर प्रेम करतो…’; इंस्टाग्राम पोस्टमुळे संतप्त नातेवाईकांनी युवकाला संपवलं; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

इंस्टाग्रामवर एका तरुणीबद्दल पोस्ट टाकल्यामुळे संतप्त कुटुंबीयांनी त्याला मारहाण करून संपवलं. मृत युवकाचे नाव एदुरुगतला सतीश असे असून तो व्यवसायाने ड्रायव्हर होता.
Telangana Shocker: ‘मी तिच्यावर प्रेम करतो…’; इंस्टाग्राम पोस्टमुळे संतप्त नातेवाईकांनी युवकाला संपवलं; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

Telangana Shocker: तेलंगणाच्या जगतियाल जिल्ह्यातील रेचापल्ली गावातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 28 वर्षीय युवकाला प्रेम प्रकरणावरून बेदम मारहाण करण्यात आली. यात या तरुणाचा मृत्यू झाला. इंस्टाग्रामवर एका तरुणीबद्दल पोस्ट टाकल्यामुळे संतप्त कुटुंबीयांनी त्याला मारहाण करून संपवलं. मृत युवकाचे नाव एदुरुगतला सतीश असे असून तो व्यवसायाने ड्रायव्हर होता. सतीशचा तरुणीबरोबर पूर्वी संबंध होता. मात्र, कुटुंबीयांनी तिच्या विवाहाची तयारी सुरू केल्याने तरुणीने हे संबंध पुढे न नेण्याचा निर्णय घेतला.

प्रेम व्यक्त करणारी पोस्ट ठरली जीवघेणी

सतीशला हा निर्णय पटला नाही. संतापाच्या भरात त्याने इंस्टाग्रामवर एक संदेश टाकला. या पोस्टमध्ये त्याने 'मी तिच्यावर प्रेम करतो आणि कोणीही तिच्याशी लग्न करू नये,' अशी पोस्ट टाकली. ही पोस्ट पाहून तरुणीच्या कुटुंबीयांचा राग अनावर झाला.

हेही वाचा – Shirdi Flood Accident: शिर्डीत मोटारसायकलस्वार चार युवक वाहून गेले; दोन ठार, साताऱ्यातही दुर्घटना

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास महिलेचे नातेवाईक सतीशच्या घरी पोहोचले. वाद वाढल्यानंतर त्यांनी सतीशला काठ्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सतीशचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – Fraud : बँकेच्या 32 वर्षीय निलंबित कर्मचाऱ्याचा प्रताप! वृद्ध आणि निष्क्रिय खातेधारकांचे 16 कोटी जुगारात गमावले!

तीन आरोपींवर गुन्हा दाखल

या प्रकरणात नथारी विनांजी, शांता विनांजी आणि जाला या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version