Mumbai Masina Hospital : मानवतेला काळीमा! आधी 3 लाखांची मागणी अन् तब्बल 8 तास मृतदेहही अडवून ठेवला; मुंबईतील मसिना रुग्णालयाचे अमानवी कृत्य

रुग्णालय म्हणजे सर्वसामान्यांसाठी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नसते, कारण तेथील डॉक्टर हे माणसाच्या रुपातील देव समजले जातात. अस असताना मुंबईतील मसिना हॉस्पिटलमध्ये तेथील स्टाफकडून संतापजनक कृत्य केलं आहे.

Mumbai Masina Hospital : मानवतेला काळीमा! आधी 3 लाखांची मागणी अन् तब्बल 8 तास मृतदेहही अडवून ठेवला; मुंबईतील मसिना रुग्णालयाचे अमानवी कृत्य

रुग्णालये ही माणुसकीची, आधाराची आणि दिलाशाची ठिकाणे असावीत अशी अपेक्षा असते; मात्र आज अनेक ठिकाणी तीच रुग्णालये सर्वसामान्यांना उपचारांच्या नावाखाली अवाजवी बिलं, अनावश्यक तपासण्या आणि दुर्लक्षपूर्ण वागणूक यामुळे गरिबांचा कोंडमारा होत असून आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. रुग्णालय म्हणजे सर्वसामान्यांसाठी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नसते, कारण तेथील डॉक्टर हे माणसाच्या रुपातील देव समजले जातात. असं असताना मुंबईतील मसिना हॉस्पिटलमध्ये तेथील स्टाफकडून संतापजनक कृत्य केलं आहे.

हेही वाचा- Devendra Fadnavis: 'धारावीवर डोळा ठेवून गैरफायदा…'; धारावी पुनर्विकास प्रकल्पावर स्पष्टच बोलले देवेंद्र फडणवीस

मुंबईतील मसिना हॉस्पिटलमध्ये एका महिला पत्रकाराच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयतील स्टाफने तब्बल 8 तास त्यांचा मृतदेह रुग्णालयातच ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 8 जानेवारी रोजी महिला पत्रकाराचे वडील महेश भालेराव यांना मसिना हॉस्पिटल ट्रस्टमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 च्या सुमारास ते मृत्यूमुखी पडले. यादरम्यान महेश भालेराव यांच्या कुटुंबीयांना त्यावेळेस पैसे आणि डॉक्युमेंट प्रोसेस अभावी रुग्णालयाने 8 तास मृतदेह अडवून ठेवला. एवढचं नव्हे तर ज्यादिवशी भालेराव यांना ॲडमिट करण्यात आले त्यादिवशी रुग्णालयाने त्यांच्या कुटुंबीयांकडून 3 लाखांची मागणी केली होती.

हेही वाचा- Crime News: ऑम्लेटचा एक तुकडा, AIची मदत आणि पोलिसांची हुशारी; कसा झाला ब्लाइंड मर्डरचा खुलासा?

विशेष म्हणजे, ॲडमिट करण्यासाठी सांगण्यात आलेली फी भरली तरंच रुग्णावर उपचार सुरु होतील असं देखील सांगण्यात आले होते. यामुळे भालेराव यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या ट्रस्टी कविता पै. यांना भेटण्याच्या विनंती केली असता त्यांनी देखील भेट देण्यास नकार दिला. यानंतर रुग्णालयाच्या भ्रष्ट कामगिरीवर संतापून पत्रकार महिलेने मुख्यमंत्री कार्यालय आणि चॅरिटी कमिशनर, मुंबई यांच्याकडे घडल्या प्रकाराबाबत तक्रारही नोंदवली. या घटनेने संवेदनाहीन ट्रस्टच्या नावाखाली भ्रष्ट बनलेल्या रुग्णालयात पुन्हा एकदा माणुसकी मेल्याचं प्रदर्शन झालं आहे. यानंतर याप्रकरणी, तीव्र संतापानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number