Crime News: माथेफिरू व्यक्तीचा भयानक क्रूरपणा; पत्नी, मुलगा अन् 2 पुजाऱ्यांना संपवलं, पोलिसांच्या चकमकीत आरोपीचा मृत्यू

अरविंद सिंह नावाच्या माथेफिरू व्यक्तीने कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नीची, घरी आलेल्या दोन पुजाऱ्यांची आणि अवघ्या 10 वर्षांच्या निष्पाप मुलाला गोळ्या झाडून संपवलं.

Crime News: माथेफिरू व्यक्तीचा भयानक क्रूरपणा; पत्नी, मुलगा अन् 2 पुजाऱ्यांना संपवलं, पोलिसांच्या चकमकीत आरोपीचा मृत्यू
कौटुंबिक वादातून चौघांना संपवलं

Crime News: उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात एक काळीज पिळवटून टाकणारी हिंसाचाराची घटना समोर आली आहे. अरविंद सिंह नावाच्या माथेफिरू व्यक्तीने कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नीची, घरी आलेल्या दोन पुजाऱ्यांची आणि अवघ्या 10 वर्षांच्या निष्पाप मुलाला गोळ्या झाडून संपवलं. या भीषण हत्याकांडानंतर आरोपीने आपल्या इतर लहान मुलांना घरात ओलीस ठेवून बंदुकीचा धाक दाखवला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला वेढा घातला. सुमारे 8 तास चाललेल्या या हाय-व्होल्टेज आणि थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर अखेर आरोपी अरविंद सिंह पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मारला गेला.

अश्रुधुराच्या नळकांड्या अन् स्टन ग्रेनेडचा वापर

घटनेदरम्यान पोलीस प्रशासनाने आरोपीला तब्बल 7 तास सातत्याने आत्मसमर्पण करण्याचे आणि मुलांना सोडण्याचे आवाहन केले. मात्र, आरोपीने पोलिसांचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. अचानक घराच्या आतून गोळीबाराचा आवाज आला, ज्यामध्ये आरोपीने स्वतःच्या 10 वर्षांच्या मुलाला गोळी मारल्याचे स्पष्ट झाले. या गोळीबारानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने स्टन ग्रेनेड आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून घरात प्रवेश केला. या दरम्यान आरोपीने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद 6 राऊंड गोळीबार केला. पोलिसांनी बचावात्मक पवित्र्यात केलेल्या प्रतिगोळीबारात आरोपी गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पाच जणांचा रक्तरंजित अंत; दोन चिमुकल्या मुलींना वाचवण्यात यश

या संपूर्ण रक्तरंजित घटनेत आरोपीसह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंभीररीत्या दुखापत झालेल्या 10 वर्षांच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. दुसरीकडे, पोलिसांनी अत्यंत सतर्कता आणि धैर्याने कारवाई करत आरोपीच्या दोन लहान मुलींना सुखरूप बाहेर काढले. या दोन्ही मुली दीर्घकाळ ओलीस राहिल्यामुळे तीव्र मानसिक धक्का, डिहायड्रेशन आणि भुकेने व्याकुळ झाल्या होत्या. त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण आझमगड परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

हेही वाचा – Udupi Man Killed Sharjah:संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय नागरिकाला निर्घृणपणे संपवलं; शारजात पार्क केलेल्या कारमध्ये आढळले मृतदेहाचे 9 तुकडे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number